पुण्यात झाड उन्मळून रिक्षावर पडल्याने महिला प्रवाशाचा मृत्यू

Spread the love

राज्यात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यात हजेरी लावली असून मुंबई पुण्यासह कोकणातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. त्यामध्ये, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचेही नुकसान झालं आहे.मुंबईच्या अंधेरी पूर्वेत ओल्ड नागरदास परिसरात जोरदार पावसामध्ये रिक्षावर झाड कोसळल्याचा धक्कादायक घटना घडली. दुपारी तीनच्या सुमारास पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू होता याच वेळी अंधेरी ओल्ड नागरदास रोडवर रिक्षा जात असताना रिक्षावर झाड कोसळला,
सुदैवाने या दुर्घटनेत रिक्षाचालक सुखरूप वाचला. मात्र रिक्षावर झाड कोसळल्यामुळे रिक्षाचा मोठा नुकसान झाला आहे. रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ अंधेरी ओल्ड नागरदास रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

पुण्यात झाड उन्मळून पडल्याने आत्तापर्यंत दुसरा बळी गेला आहे, पुण्यातील निलायम टॉकीजच्या समोर रस्त्यावर झाड पडल्यामुळे रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला. 76 वर्षीय शुभदा सप्रे नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच अलंकार पोलीस ठाण्याजवळ राहुल जोशी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर, आज नीलायम ब्रीज ते नाशी फडके जाणारे रोडवरून 3.30 वाजता ही घटना घडली.

दरम्यान, कोकणात वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामध्ये, प्रवाशांसह एसटी बसही अडकून पडली होती.येथील अनेक घरांची कौले व पत्रे उडाले असून अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी अचानक जोरदार वारा सुटल्याने आलेल्या वादळात परिसरातील लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *