भारतीय विमान सेवा क्षेत्रात विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सरकारी नोकरीच्या (Govt Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय विमान सेवा क्षेत्रात विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन एव्हिएशन सर्व्हिसेस (BAS) ने ग्राहक सेवा एजंट (CSA) आणि विमानतळांसाठी लोडर/हाउसकीपिंगच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेद्वारे एकूण 3508 पदे भरली जातील. यामध्ये ग्राहक सेवा एजंट (CSA) आणि लोडर/हाउसकीपिंगच्या पदांचा समावेश आहे. दरम्यान, जे तरुण या पदांसाठी इच्छुक असतील त्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी अर्ज करणं गरजेचं आहे.

कुठे कराल अर्ज?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना bhartiyaaviation.in या साईटवर जावे लागेल. तिथे जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहितीही मिळेल.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *