मेष – आजचा दिवस खूप आनंदाचा असेल. व्यवसायात काही डील फायनल होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरु असलेले प्रयत्न आज संपतील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. तुमच्या कीर्ती आणि वैभवात वाढ होईल. नोकरदार लोकांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा.
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. पालकांना धार्मिक स्थळी घेऊन जाल. सरकारी नोकऱ्यांशी संबंधिक लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ मिळेल. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल.
मिथुन – आजचा दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळतील. राजकीय कारकीर्दीत पुढे जाल. व्यवसायात नवीन योजना तुमच्या मनात येतील. वडिलांचा सल्ला जरुर घ्या. विद्यार्थ्यांना वरिष्ठांची आवश्यकता भासेल.
कर्क – आजचा दिवस सर्जनशील कार्यात घालवाल. शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्याने आनंदी असाल. जुन्या मित्राला भेटल्याने काही कामे मार्गी लागतील. कामात तुम्हाला स्वत:ला झोकून द्यावे लागेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
सिंह – आजचा दिवस तुमचा खूप व्यस्त असेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वेळ काढाल. लाइफ पार्टनरसोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे अडथळे येतील. बोलण्यात गोडवा राहू द्या
कन्या – आजचा दिवस तुमच्या वर्तनात सावध राहाण्याचा आहे. नोकरदार लोकांना शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुमच्या प्रगतीमुळे त्यांना संशय येईल. शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. व्यावसायिकांनी पार्टनरशीपमध्ये विश्वास ठेवणे टाळा.
तुळ – आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित सुरु असलेले वाद तुमच्या बाजून निकाल देतील. नवीन प्रकल्पावर सुरु केलेले काम पूर्ण कराल. कुणाच्याही वादात पडणे टाळा.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरुपाचा असेल. नोकरी आणि व्यवसायात नावीन्य आणाल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील कलह आज थांबेल. कौटुंबिक वातावरण शांत राहिल. व्यवसायात फायद्याच्या छोट्या संधी मिळत राहतील.
धनु – आजचा दिवस तुमच्यासाठी सावध राहाण्याचा आहे. तुमच्या दैनंदिन कामांच्या पलिकडे जाऊन दुसरे काम कराल. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. व्यवसायात जोखीम घ्यावी लागेल. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहिल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलाच्या शिक्षणासंबंधीत निर्णय घ्यावे लागेल. जोडीदाराचा सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. आज तुमची चिंता वाढू शकते. बुद्धीचा वापर करुन योग्य निर्णय घ्यावे.
कुंभ – आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुम्हाला सावध राहावे लागेल. कोणताही निर्णय घेताना घाईने घेऊ नका. प्रत्येक काम विचारपूर्वक करा. आजार तुम्हाला प्रभावित करतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर बाहेर पडाल. तुम्हाला कोणतीही समस्या आली तरी वागणूक गोड ठेवा. घरी कार्यक्रम आयोजित कराल. व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करली तर फायदा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)