आजचे राशीभविष्य 17 August 2024 : लेखणी बुलंद टीम
मेष – आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल.तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल.आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.
वृषभ – आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल.
मिथुन – आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल.तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. मानसिक शांतता राखा.आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं.मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल.
कर्क – आज ऑफिसमध्ये घमंड किंवा रागात येऊन कोणतंही कार्य करू नका. ते तुमच्याच आंगलट येऊ शकतं.जे हृदयरोगी आहेत त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. तुमची औषधं वेळेवर घ्या. गोळ्या अजिबात चुकवू नका.जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर देखील आंधळेपणाने विश्वास ठेवला पाहिजे. तरच तुमची व्यवसायात प्रगती होईल.आज तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा. कुटुंबासाठी हे पुण्य काम ठरणार आहे. तसेच, धन-धान्यातही वाढ होईल असा संकेत आहे.
सिंह – आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यासाठी कामात लक्षपूर्वक काम करा.जर तुम्हाला ब्लड प्रेशरची समस्या असेल तर तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला त्रास होईल अशी कोणतीही कामं करू नका. वेळेवर औषधं घ्या.जे युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. फक्त प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यास करा.तुमच्या नात्यातील जे जुने वाद आहेत ते वारंवार तुमच्या बोलण्यात आणू नका. यामुळे तुमचे नातेसंबंध आणखी बिघडतील.
कन्या – कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. एकंदरीत तुम्ही खुश असाल.तुम्ही त्वचेशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जे ब्युटी प्रोडक्ट्स वापरत आहात ते वापरण्याआधी चांगला रिसर्च करा. मगच ते वापरा.तरूणांनी आपल्या भविष्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. फालतू कामांकडे लक्ष न देता भविष्यावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या.आज दूरचे नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतात. अशा वेळी आलेल्या पाहुण्यांशी नीट संवाद साधा. त्रागा करू नका.
तूळ – नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी सावधानतेचा असणार आहे. ऑफिसमध्ये कामाच्या बाबतीत नवीन प्रयोग करू नका. गोंधळात पडू शकता.व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यापारी फार विचारपूर्वक आपला व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.तुमचे प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक चाांगले होतील. नात्यात जोडीदाराकडून समजूतदारपणा जास्त वाढताना दिसेल.तुमची तब्येत चांगली असेल फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे तुमचं पोट बिघडू शकतं.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी आज तुमचं मन रमणार नाही. अनेक गोष्टींचा विचार तुमच्या मनात सतत तुम्हाला त्रास देत राहील.तरूणांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. नात्याला वेळ द्या. सर्व गोष्टी सुरळीत होतील.कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कामाच्या व्यापातून कुटुंबियांनाही थोडा वेळ द्या.आज आहार चांगला घ्या. हेल्दी खाण्यावर लक्ष द्या. बाहेरच्या खाण्यामुळे तुमचं पोटही बिघडू शकतं त्यामुळे सावध राहा.
धनु – जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.व्यापारी वर्गातील लोकांना लवकरच नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मित्राच्या मदतीने तुमचं काम अधिक सोपं होणार आहे.आज कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळी जाण्याचा योग येणार आहे. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मन प्रसन्न राहील.तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या केसांचीही योग्य काळजी घ्या. वेळीच उपचार न केल्यास समस्या अधिक वाढू शकते.
मकर – तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो.गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा.आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल.आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.
कुंभ – नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे.विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात.आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.
मीन – तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे.तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल.आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.