लेखणी बुलंद टीम:
इंटरनॅशनल पॉपस्टार गायक जस्टिन बीबरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जस्टिन बीबरची पत्नी मॉडेल हेली बीबर हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने आपल्या नवजात बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. जस्टिन आणि हेली यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. या वर्षी मे महिन्यात जस्टिन आणि हेलीने चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती की, ते लवकरच आई-बाबा होणार आहेत.
जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन
पॉप सिंगर जस्टिन बीबर (Justin Bieber) आणि त्याची पत्नी हेली बीबर आई-बाबा झाले आहेत. जस्टिनची पत्नी हेलीने बाळाला जन्म दिला आहे. जस्टिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. यासोबतच त्याने फोटो शेअर करत बाळाची पहिली झलक दाखवली आणि त्याचं नावही सांगितलं आहे. जस्टिन बीबर आणि हेलीचे लग्न 2018 मध्ये झालं, आता बाळाच्या आगमनानंतर दोघांच्याही आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
जस्टिन बीबरच्या मुलाचं नाव काय?
जस्टिन बीबरने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जस्टिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे पाय दिसत आहेत. जस्टिन बीबर आणि हेली बीबर बेबी यांनी नवजात बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. जस्टिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये हेली बीबरच्या हातात बाळाचा पाय दिसत आहे. यासोबत जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आमच्या घरात स्वागत आहे, बाळा’. जस्टिनने मुलाचे नाव जॅक ब्लूस बीबर असं ठेवलं आहे.
हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म