ठाणे महानगरपालिकेने (TMC) 28 मे ते 31 मे दरम्यान मेट्रो बांधकामाच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईहून नाशिक, घोडबंदर आणि भिवंडीकडे माजिवडा पुलावरून जाणाऱ्या सर्व वाहनांवर परिणाम होईल. कापूरबावडी वाहतुक उपविभागाचे हद्दीत माजिवडा मेट्रो स्टेशनवर, 28 ते 31 मे पर्यंत रूफ (मेट्रो स्टेशनचे छत) उभारण्यासाठी कॉलम उभे करून, त्यावर जॅक बिम टाकण्यात येणार असून, जॅक बिम उभारल्यानंतर त्यावर राफ्टर उभारण्यात येणार आहे. सदरचे काम हे 60 टनी मोबाईल क्रेनच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. यामुळे माजिवडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक चार दिवस रात्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवेश बंद (1)- मुंबईकडून माजिवडा उडाण पुलावरून ज्युपीटर बाय जंक्शन मार्गे घोडबंदरकडे अथवा भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे सुरुवातीला दुभाजकाजवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटलसमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाऊन कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद (2)- मुंबईकडून माजिवडा उड्डाणपुलावरून ज्युपीटर वाय जंक्शन मार्गे नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व्हिव्हियाना मॉलसमोरील ब्रिज चढणीचे
पर्यायी मार्ग- सदरचे मार्गावरून जाणारी सर्व प्रकारची वाहने ही ज्युपीटर हॉस्पीटल समोरील स्लीप रोडने पुढे सरळ जावून गोल्डन कॉस मार्गे इच्छित स्थळी जातील.