जिल्ह्याच्या चिखली (buldhana) तालुक्यातील रायपूर येथे एक बोगस डॉक्टरचा (Doctor) पर्दाफाश झाला असून आयुर्वेदिक डॉक्टरच्या रुग्णालयात अवैध गर्भपात करत असताना जिल्हा शल्य चिकित्सकांनी छापा मारला. गर्भपातासंदर्भातील कुठलीही परवानगी आणि शैक्षणिक अर्हता नसताना येथील डॉक्टर महोदयांकडून अवैधपणे गर्भपात करण्यात येत होता. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर थेट जिल्हा शल्य चिकित्सकांनीच रुग्णालयात धाड टाकली. त्यानंतर, रायपूर येथील डॉ. उज्वल खंडागळे यांच्या खंडागळे हॉस्पिटल वर जिल्हा शल्य चिकित्सकांची PCPNDT कायद्यअंतर्गत मोठी कारवाई (police) केली आहे. या कारवाई दरम्यान भ्रूण अवशेष मिळाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रायपूर या गावात उज्वल खंडागळे या आयुर्वेदिक डॉक्टरच्या खंडागळे हॉस्पिटल या रुग्णालयावर गोपनीय माहितीच्या आधारे अवैध गर्भपात करत असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व पथकाने छापा टाकला. यावेळी, सदर डॉक्टरला गर्भपात करताना रंगेहात पकडण्यात आल्याने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावेळी या डॉक्टरकडे कुठलीही गर्भपात करण्याची परवानगी अथवा शैक्षणिक अहर्ता नसल्याचं तपासात आढळून आलं. वैद्यकीय पथकाने पोलिसांच्या मदतीने तपासणी केली असता भ्रूणहत्येचे अनेक अवशेष आणि एक संपूर्ण भ्रूण याठिकाणी सापडलं आहे. त्यामुळे, जिल्हा शल्य चिकित्सकांनी PCPNDT कायद्याअंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी करण्यात आलेली कारवाई ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई मानल्या जात आहे. हा डॉक्टर किती वर्षापासून भ्रूणहत्या, अवैधपणे गर्भपात करत होता? याची चौकशी आता पथक व पोलीस करत आहेत. त्यानंतरच, अनेक खुलासे समोर येणार आहेत. दरम्यान, या कारवाई दरम्यान मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानुसार, अद्यापही तपास आणि कारवाई सुरुच असल्याचे समजते.