लेखणी बुलंद टीम:
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लगत असलेल्या बुद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खू कुटीला अतिक्रमण ठरवून बेगमपुरा पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बुद्ध लेणी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले . या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध भिक्खू व उपासक सहभागी होते . दरम्यान, या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुटी जाहीर करण्यात आली आहे.
या बुद्ध लेणी बचाव महामोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना गट – तट विसरून सहभागी होऊन ऐतिहासिक अशी मोर्चा नोंद झाली . माहितीनुसार किमान पाच ते सात लाख उपासक या महामोर्चात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते आहे , असा विश्वास भिक्खू संघाने व्यक्त केला आहे. बुद्ध लेणी परिसर हा ऑक्सिजन हब असल्याने निसर्ग प्रेमींनी या मोर्चात सहभागी झाले
भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे या महामोर्चाचे नेतृत्व करणार असून महाराष्ट्र भरातील बौद्ध भिक्खू या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे भन्ते संघप्रिय यांनी सांगितले.
क्रांतीचौक येथून या महामोर्चाला सुरूवात करत पैठण गेट, टिळक पथ, गुलमंडी, सिटीचौक, शहागंज येथील गांधी पुतळा, हर्ष नगरमार्गे हा महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकेले .
महामोर्चाच्या प्रमुख मागण्या
१) बुद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.
२) बुद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा.
बुद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा.
३) बुद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणीच्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी.
४) ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी.
५) अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे.
६) महाराष्ट्रातील सर्व बुद्ध लेण्यावरील इतर धर्मीयांची अतिक्रमणे तत्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बुद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा.
या महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, भंते बोधीधम्म, भंते उपाली भंते निर्वाण, भंते आनंद व सर्व आंबेडकरी समाजाने परिश्रम घेतले
पहा व्हिडिओ: