२२ वर्षीय सुनेकडून सासूची निर्घृण हत्या, मृतदेह बॅगेत ..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

महाराष्ट्रातील जालना मध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने प्रथम तिच्या सासूची निर्घृण हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने एका बॅगेत भरला. पण, जेव्हा ती ते करू शकली नाही, तेव्हा तिने पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरमालकाने बॅगेत मृतदेह पाहिला आणि पोलिसांना कळवले.

मिळालेल्या माहितीनुसार २२ वर्षीय महिलेने भांडणातून तिच्या सासूची घरातच हत्या केल्याचा आरोप आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बुधवारी आरोपी महिला प्रतीक्षा शिंगारे हिला परभणी शहरातून अटक केली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, आरोपी महिलेचा विवाह लातूरमधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या आकाश शिंगारेशी सहा महिन्यांपूर्वी झाला होता. आरोपी महिला तिच्या सासू सविता शिंगारे सोबत जालन्यात भाड्याच्या घरात राहत होती. पोलिस उपनिरीक्षक यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दोन्ही महिलांमध्ये भांडण झाले, त्यानंतर महिला आरोपीने तिच्या सासूचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर हल्ला केला. यामुळे सासूचा मृत्यू झाला. तसेच या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याचे अधिकारींनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *