‘मला तू मॅच होत नाही, आपली जोडी…’; नवरदेवाकडून झालेला अपमान सहन नाही झाला आणि नवरीने..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुलगा व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न मोडल्याने 22 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनिका सतीश सुरवसे (22, रा. डिसलेवाडी ता. जामखेड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

मुलीचे वडील सतीश दादासाहेब सुरवसे यांनी गुरुवारी (दि. 27) जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून महेश दत्तात्रय मेंगडे (हल्ली रा. चिखली, कदळवाडी मोशी, ता. चाकण, जि. पुणे, मुळ रा. कर्जत), अनुजा दत्तात्रय मेंगडे व दत्तात्रय पांडुरंग मेंगडे (रा. कर्जत, जिल्हा. अहिल्यानगर ) अशा तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘तू मला आवडली नाही, आपली जोडी शोभत नाही’
याबाबत अधिक माहिती अशी की, मोनिकाचा विवाह कर्जत येथील महेश मेंगडे याच्याशी जमला होता. मात्र लग्न जमल्यानंतर ‘तू मला आवडली नाही, मला तू मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही’ असे म्हणत महेशने मोनिकाला अपमानित केले होते. तसेच मुलाची आई आरोपी अनुजा दत्तात्रय मेंगडे व मुलाचे वडील दत्तात्रय पांडुरंग मेंगडे हेही मुलीच्या वडीलांना म्हणत होते की, ‘तुमची मुलगी आमच्या मुलाला शोभून दिसत नाही’.

मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
त्यामुळे त्यांनी माझ्या मुलीचे जमलेले लग्न मोडले. लग्न मोडल्याच्या मानसिक त्रासामुळे डिसलेवाडी येथे राहत्या घरात मोनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह आई-वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पालीस निरीक्षक सोनवलकर करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *