चेन्नईच्या एमए चिदंबरमच्या खेळपट्टीवर यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा तळपली, जिथे रोहित-विराट आणि शुबमनसारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. या अवघड खेळपट्टीवर डावखुऱ्या सलामीवीराने शानदार अर्धशतक झळकावले. जैस्वालने पंतसोबत अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. त्याबरोबर या अर्धशतकाच्या जोरावर त्याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने ८९ वर्षे जुना कसोटी विक्रम मोडीत काढत इतिहास लिहिला आहे.
२०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून यशस्वी जैस्वाल प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम करत आहे. २२ वर्षीय युवा खेळाडूने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एक मोठा पराक्रम केला आहे. तो ८९ वर्षांचा विक्रम मोडत मायदेशात पहिल्या १० डावात ७५० हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.