समाजकार्यासाठीचा ‘मृत्युंजय’ कार ‘शिवाजीराव सावंत स्मृती समाजकार्य’ पुरस्कार यजुर्वेंद्र महाजन यांना प्रदान करण्यात आला.
मनोबलची दिव्यांग विद्यार्थिनी स्नेहल शिंदे, मनोबलचे सदस्य नाना शिवले, सहकारी अमोल लंके यांच्यासह त्यांनी तो स्वीकारला.
ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक विजय कुवळेकर, श्रीमती मृणालिनी सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यजुर्वेंद्र महाजन यांचे कार्य जाणून घेतल्यानंतर उपस्थितांचे आणि आमचे सर्वांचे डोळे पाणावले आणि उघडले. देशातील दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य खऱ्या अर्थाने दीपस्तंभासारखे ठरले आहे : श्री.विजय कुवळेकर
दीपस्तंभ फाऊंडेशन आणि मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजातील सर्व प्रकारच्या उपेक्षित बंधू भगिनींच्या, विशेषतः दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जे काम उभारले आहे ते खूपच प्रेरणादायी व पथदर्शी आहे. दीपस्तंभच्या कार्यात आपण सर्वांनीच यथाशक्ती सहभागी व्हायला हवे : मृत्युंजय प्रतिष्ठानचे संस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त डॉ.सागर देशपांडे.
यजुर्वेंद्र मास्तरांनी हा पुरस्कार देश परदेशातील निस्वार्थ भावनेने वेळ,कौशल्य व निधी देणाऱ्या संस्थेच्या आजीवन सदस्यांना अर्पण केला.
पुढील पंधरा वर्षात दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी देशभरात व्यवस्था उभारल्या जाण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यजुर्वेंद्र मास्तरांनी या प्रसंगी केला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे हितचिंतक माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत, मनशक्ती लोणावळ्याचे प्रमोदभाई शिंदे, लोकमान्यचे मा. किरण ठाकूर, डॉ. विकास हरताळकर, तसेच डॉ. रेणू आणि राजा दांडेकर उपस्थित होते