लेखणी बुलंद टीम:
नवी मुंबई : अटल सेतू पुलावरून 56 वर्षीय महिलेने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल पुलावर गेल्या काही दिवसांत आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा अटल सेतूवर अशी घटना घडली. एक महिला पुलावरती जाऊन बसली असल्याची माहिती न्हावी सेवा वाहतूक पोलिसांना मिळाले होते.
अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शौर्य दाखवत महिलेचे प्राण वाचवले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहिती नुसार तिने पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, आधी कॅब चालकाने व नंतर पोलिसांनी आपल्या चपळाईने आणि धाडसाने महिलेला वाचवले . वाहतूक शाखेचे ललित शिरसाट किरण मात्रे यश सोनवणे व्यायाम मधून ग्रस्त चालत आले
महिला धार्मिक वस्तूंचे तसेच देवांच्या फोटोंचे विसर्जन करत होती. याआधी जुलै महिन्यातही एका 38 वर्षीय अभियंत्याने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सदर महिला मुलुंड परिसरातील राहणारी असून नैराश्यात ती आत्महत्येचा उद्देशाने त्या ठिकाणी आले होती.
पहा व्हिडीओ:
*TRIGGER WARNING: VIEWER DISCRETION ADVISED*
MUMBAI VIDEO: Woman Tries To End Life By Jumping Off Atal Setu, Gets Saved By Man Who Grabs Her Hand As She Dangles From Bridge Before Cops Pull Off Dramatic Rescue.
Hats Off! #MumbaiPolice #MumbaiTrafficPolice pic.twitter.com/mP8YfWtLGW
— Abhishek Yadav (@geopolimics) August 16, 2024