म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये महिलेने केली पैशांची उधळण,जाणून घ्या कारण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

राजधानी मुंबईत स्वत:चं घर (home) घ्यावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारच्यावतीने म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमांतून सर्वसामान्यांना मोठी मदत होते. मात्र, याच कार्यालयात अनेकदा नागरिकांकडे पैशांची मागणी केली जाते किंवा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रासही दिला जातो. अशाच प्रकारचा त्रास सहन न झाल्याने एका महिलेनं चक्क नोटांचा पाऊसच म्हाडाच्या कार्यालयात पाडल्याचं पाहायला मिळालं. म्हाडा मुख्यालयात महिलेकडून अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये चक्क पैशांची उधळण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या महिलेकडून कार्यालयात संतप्त होऊन म्हाडाच्या (Mhada) अधिकाऱ्याविरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं दिसून मिळालं. घटनेच्यावेळी संबंधित अधिकारी म्हाडा कार्यालयात गैरहजर होते. मात्र, पाणी पिण्यासाठी बाहेर गेल्याने तिथं उपस्थित नव्हते. या घटनेनंतर संबंधित महिलेला सुरक्षारक्षकांनी तातडीने बाहेर काढले.

म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई, कोकण मंडळातून नागरिकांसाठी घरे उपलब्ध करुन दिली जातात. लॉटरी सोडतच्या माध्यमातून ही घरे नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत मिळतात. त्यामुळे, हजारो नागरिक या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करतात. त्यानंतर, अनेकदा म्हाडाच्या कार्यालयात चकरादेखील मारत असतात. विशेष म्हणजे दरोरज 4 ते 5 हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयास भेट देतात. शुक्रवारी अशाच कामानिमित्ताने आलेल्या एका महिलेनं म्हाडातील अधिकाऱ्यांविरुद्ध चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यावेळी, चक्क नोटांची उधळण केली.

गळ्यात नोटांच्या माळा घेऊन आलेल्या महिलेनं चक्क कार्यालयातच नोटांची उधळण केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, कार्यालयातील सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, “माझ्या अंगाला हात लावाल, तर मी उडी मारेन”, अशी धमकी महिलेकडून देण्यात आल्याने म्हाडा कार्यालय आणि परिसरात गोंधळ उडाला होता. या प्रकारामागे भ्रष्टाचाराचे गौडबंगाल आहे का? अशी चर्चा म्हाडा मुख्यालयात रंगली आहे. तसेच, म्हाडा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *