गौतम बुद्ध नगर मध्ये महिलेला 34 लाख रुपयांना गंडा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

‘डिजिटल अरेस्ट’ सायबर गुन्हे घोटाळ्यात महिलची फसवणूक, गौतम बुद्ध नगरमध्ये (Gautam Buddha Nagar ) जिल्ह्यात ईडीच्या बनावट नोटीसचा वापर करून महिलेकडून 34 लाखांचा गैरव्यवहार गौतम बुद्ध नगर पोलीस सायबर गुन्ह्याच्या धक्कादायक प्रकरणाचा तपास करत आहेत. ज्यात एका महिलेला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) बनावट नोटीसांची (Fake ED Notices) धमकी मिळाल्यानंतर 34 लाख रुपये गमवावे लागले. डिजिटल अरेस्ट (Digital Arrest Fraud) प्रकार वापरुन फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर फौजदारी खटला दाखल करणयात आल्याची माहिती दिली. तिला एक नोटीसपाठवले आणि पुढे तिच्यावर दबाव टाकून पैसे हस्तांतरित करण्यासाठी प्रवृत्त केले.

काय आहे प्रकरण?
सेक्टर-41 येथील रहिवासी असलेल्या निधी पालीवाल या पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 8 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या फोनकॉलवरुन या घटनेला सुरुवात झाली. आोरपींनी तिच्यावर आरोप केला की, तिच्या नावाने एक पार्सल मुंबईहून इराणला पाठवण्यात आले होते, ज्यात संशयास्पद वस्तू होत्या, ज्यात खालील गोष्टींचा समावेश होताः

पाच पारपत्र

दोन डेबिट कार्ड्स

दोन लॅपटॉप

900 अमेरिकन डॉलर्स

200 ग्रॅम अमली पदार्थ
आरोपींनी तिच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला आणि व्हॉट्सअॅपद्वारे एक ईडीच्या नावे नोटीस पाठवली. जी पूर्ण बनावट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

भीतीपोटी खंडणी
पीडितेने सांगितले की फसवणूक करणाऱ्यांपैकी एकाने तिच्यासोबत स्काइप व्हिडिओ कॉल केला, मात्र कॅमेरा बंद होता. त्यांनी तिच्यावर दबाव टाकला आणि तिला कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला. नंतर या सर्व प्रकारातून सुटका व्हावी यासाठी तिला पैसे देण्यास सांगितले. तिच्याकडून 34 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत करुन घेतल्यावर अचानक त्यांनी संवादच बंद केला.

गौतम बुद्ध नगर सायबर गुन्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विजय कुमार गौतम यांनी या प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले.तसेच, प्रकरणाचा तपास सुरु असल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपींनी पीडितेविरुद्ध बनावट आरोपांसह बनावट ई. डी. ची नोटीस पाठवली. पैसे हस्तांतरित करण्यासाठी तिला धमकावण्यासाठी या युक्तीचा वापर करण्यात आला, असे इन्स्पेक्टर गौतम म्हणाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *