लेखणी बुलंद टीम :\
घराला स्वच्छ ठेवणे प्रत्येक महिलेला आवडते. पण स्वच्छतेसाठी कोणीही आपल्या जीवाला धोक्यात टाकत नाही.पण मुंबईत एका इमारतीच्या 16 व्या मजल्यावर एक महिला चक्क खिडकी स्वच्छ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुख्य म्हणजे या वेळी महिलेने कोणतीही सुरक्षा उपकरणे न घेता निष्काळजीपणे खिडकीचा काचा पुसताना दिसत आहे. तिचा हा निष्काळजीपणा तिच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संतापून आपापली प्रतिक्रिया देत आहे.
हा व्हिडीओ मुंबईतील कांजूरमार्गातील एका इमारतीचा आहे.या मध्ये एक महिला इमारतीच्या 16 व्या मजल्यावर एका रुंद जागेत उभी राहून खिडकीच्या काचा बाहेरून स्वच्छ करत आहे. ती हे काम बिनधास्तपणे करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओ वर नेटकऱ्यानी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी तिला स्टंटमॅनची मुलगी म्हटले तर काही तिला मोलकरीण समजत असून घरमालकावर कारवाई करण्याची मागणी करत आहे.
पहा व्हिडीओ:
#Mumbai #Viral | Watch this woman daringly clean the outer window of flat in a high rise standing on a narrow ledge. Is this video from Kanjur Marg in Mumbai! pic.twitter.com/hYcvKi2GhE
— Siraj Noorani (@sirajnoorani) August 11, 2024