बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला राहत्या घरातच पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे उघड झाली आहे. इतकंच नाहीतर राहत्या घरात पत्नीने पतीला पुरल्यानंतर त्यावर पतीच्या भावाकडूनच टाईल्सही लावून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नालासोपारा पूर्व गडगापाडा येथील साई वेल्फेअर सोसायटीच्या एका चाळीच्या रूममध्ये ही घटना घडली आहे. गुडीया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा असे आरोपी बॉयफ्रेंड आणि प्रियेसीचे नाव आहे. तर विजय चौहान असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. यांना एक चेतन चौहान हा 8 वर्षांचा मुलगा आहे. तर बॉयफ्रेंड आणि प्रियेशी यांचे आजूबाजूलाच घर आहे. पती हा या दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून, राहत्या घरात निर्घृणपणे हत्या करून त्याला घरातच पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.