‘या’ तारखेला लागू होणार आठवा वेतन आयोग लागू ? वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात असलेल्या भाजपप्रणीत एनडीए सरकारने आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्यास 16 जानेवारी 2025 या दिवशी मान्यता तर दिली. ज्यामुळे केंद्र सेवेत असलेल्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुमारे 65 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे (Central Government Employees) निवृत्तीवेतन आणि भत्ते सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाल्यावर या कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वेतन मोठ्या प्रमाणावर वाढले होते. नव्या वेतनसुधारणेमुळे त्यात अधिक वाढ होण्याचीच शक्यता आहे. पण, ही नवी वेतनवाढ केव्हा लागू होणार? आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केव्हा स्वीकारल्या जाणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. याबाबतच घ्या जाणून.

नवा वेतन आयोग लागू होण्याची तारीख निश्चित?
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून दावे केले जात आहेत की, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची अपेक्षा असलेला आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याचीच शक्यता आहे. पण, त्यात तथ्य नाही. केंद्र सरकारने अद्याप तरी याबाबत चकार शब्द काढला नाही, तसेच कोणतीही तारीख दिली नाही. उलट केंद्र सरकारचे निर्णय आणि योजना, धोरण या बाबींचा अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात की, प्रक्रियात्मक आणि धोरणात्मक विचारांमुळे शिफारशींच्या अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो.

आठव्या वेतन आयोगास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला 16 जानेवारी 2025 रोजी अधिकृत मान्यता दिली. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना, भत्ते आणि निवृत्तीवेतनात बदल करण्याचे आणि त्यांची शिफारस करण्याचे काम या समितीवर सोपवण्यात आले आहे. आयोगाच्या शिफारशींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, कारण त्यांचा सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांच्या उत्पन्नावर आणि फायद्यांवर लक्षणीय परिणाम होईल. पुनरावलोकन केलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये खालील बाबींचा समावेश आहेः

वेतन पॅनेल फिटमेंट फॅक्टर1.92 ते 2.86 च्या श्रेणीत राहू शकेल.

जर 2.86 फिटमेंट फॅक्टरच्या शिफारशीला हिरवा कंदील मिळाला तर, सरकारी कर्मचाऱ्याचा

किमान मूळ पगार18,000 रुपये प्रति महिना वरून 51,480 रुपये होईल. त्याच घटकावर

आधारित किमान पेन्शन सध्याच्या 9,000 रुपयांवरून25,740 रुपयांपर्यंत वाढेल.

दरम्यान, आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या आजी माजी कर्मचाऱ्यांचे वेतनांमध्ये होत असलेल्या बदलामध्ये समाविष्ट होऊ शकणाऱ्या संभाव्य बाबी या प्रसारमाध्यमांतून दिले जाणारे वृत्त आणि अहवालांवरुन दिलेल्या आहेत. लेटेस्टली मराठीने त्याची स्वतंत्र पडाळणी केली नाही किंवा त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *