लेखणी बुलंद टीम:
26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे. याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्याच्या यादीनुसार या सणानिमित्त देशात वेगवेगळ्या ठिकाणी 26 ऑगस्ट रोजी बँका बंद असतील. तर काही भागात बँका चालू राहतील. याच पार्श्वभूमीवर 26 ऑगस्ट रोजी देशाचा शेअर बाजार चालू राहील का? असे विचारले जात आहे.
मुंबई शेअर बाजार म्हणजेच BSE च्या अधिकृत संकेतस्थळानुसार राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजार(BSE) जन्माष्टमीच्या दिवशी (26 ऑगस्ट) चालू राहील. याबाबतची अधिकृत माहिती बीएसईच्या संकेतस्थळावर अपलब्ध आहे. बीएसईच्या संकेतस्थळावर जाऊन ‘ट्रेडिंग हॉलिडे’ या पर्यायावर क्लिक केल्यास 2024 सालच्या शेअर बाजाराच्या सुट्टीच्या सर्व तारखा दिसतील.
आता 2 ऑक्टोबरला सुट्टी
बीएसईच्या संकेतस्थळानुसार ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्ट हा फक्त एक ट्रेडिंग हॉलिडे होता. या दिवशी शेअर बाजार बंद होता. आता 15 ऑगस्ट 2024 नंतर 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी ट्रेडिंग हॉलिडे असेल. म्हणजेच येत्या सोमवारी BSE आणि NSE बाजार चालू असेल.
वर्षात एकूण चार दिवस सुट्टी Stock market holidays in August 2024
2024 साली भारतीय शेअर बाजाराला एकूण 15 सुट्ट्या असतील. 15 ऑगस्ट 2024 नंतर आता चालू वर्षात फक्त चार दिवस ट्रेडिंग हॉलिडे असतील. 2 ऑक्टोबर 2024 (महात्मा गांधी जयंती), 1 नोव्हेंबर 2024 (दिवाळी/लक्ष्मी पूजन), 15 नोव्हेंबर 2024 (गुरु नानक जयंती) आणि 25 डिसेंबर 2024 (ख्रिसमस) असे हे चार ट्रेडिंग हॉलिडे आहेत. याशिवाय प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो.