सोलापुरात खुनासोबतच आत्महत्येची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. नवऱ्याने आपल्या बायकोला नेमकं का मारलं आणि स्वत: आत्महत्या का केली? असे विचारले जात आहे.
इथे एका पतीने आपल्या पत्नीचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून केला आहे. विशेष म्हणजे बायकोचा खून करून पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली आहे. पत्नीने आपल्या पत्नीचा खून नेमका का केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गोपाळ लक्ष्मण गुंड आणि गायत्री गोपाळ गुंड अशा दोघा पती-पत्नींची नावे आहेत. गोपाळ गुंड याने आपल्या बायकोचा चार्जरच्या वायरने गळा आवळत खून केला आहे.
विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. असे असताना नवऱ्याने बायकोचा खून करून स्वत: आत्महत्या केल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.