महाराष्ट्रातच मराठी भाषेची गळचेपी नालासोपाऱ्यात मराठी प्रवाशावर दादागिरी करणारा रेल्वेच्या टीसीला निलंबन करण्यात आले . मराठी बोलणार नसल्याची लेखी हमी घेतल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता. अखेर मराठी एकीकरण समितीच्या ठिय्याला यश मिळाले आहे. रितेश मौर्या असं हिंदी भाषिक टीसीचे नाव आहे. नालासोपारा रेल्वेस्थानाकात मराठी दाम्पत्याकडून यानंतर मराठी बोलणार नाही अशी लेखी पत्रक लिहून घेतल्याचा मराठी एकीकरण समितीने आरोप केला होता .
ही घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच नालासोपारा रेल्वेस्थानाकात सोमवारी किमान 4 तास मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता .
नेमके काय घडले?
रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत रविवारी रात्री ८ ते ९ सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात घडला आहे. त्यांच्याकडे एका तिकीट तपासणीसाने तिकीट मागितले पण एप सावकाश चालत असल्याने तिकीट पाहण्यात उशीर झाला. तोपर्यंत सदर तिकीट तपासणीस रितेश मोर्य कोणत्यातरी भाषेत उद्धटपणे या दाम्पत्यावर बोलू लागला . त्याची भाषा न समजल्यामुळे तुम्ही काय बोलता हे कळले नाही मराठीत बोला अशी विनंती सदर दाम्पत्यांनी मोर्यकडे केली.
संतप्त झालेल्या टीसीने “ये इधरकी मराठी वगैरे हम बोलते नही,हम सेंटर के आदमी है,हिंदी मैं बात करेंगे” अशी अरेरावी केली. सदर घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचं कळताच मौर्यने या दाम्पत्याचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर शिवीगाळचा खोटा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि पोलिसांना बोलवून घेतले, रेल्वे मे मराठी नही चलेगा अशी धमकी देत त्यांना आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले. एवढच नाही तर पाटील दामपत्याकडून मराठी न बोलण्याचे लेखी लिहून घेतले होते. तर पाटील यांच्या पत्नीने काढलेला व्हिडीओ ही जबरदस्तीने डिलीट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रवाशासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
मराठी भूमिपुत्र प्रवाशीवर दादागिरी करणारा रेल्वेचा टीसीवर अखेर तात्पुरत निलंबन करण्यात आले आहे . पुढील कारवाही वरिठ रेल्वे अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले आहे . संगण्यात येत आहे की रेल्वेचा टीसीवर दोषी आढल्यास त्याला कायमचे निलंबित करू अशी गवाही रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली .
महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या ‘अभिजात मराठी जाणून घेणे आणि इतर भाषा समजत नसेल तर मराठी भाषेत विचारणे हा स्थानिकांचा मूलभूत हक्क आहे.मात्र वरील प्रकरणावरून संबधित कर्मचारी भाषिक द्वेष करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.अधिकाराचा माज आणि गैरवापर करून माफीनामा लिहून घेणे हा प्रकार कडक शिस्तभंगास पात्र आहे.
संघराज्य शासनाच्या राजभाषा विभागाच्या आदेशानुसार सर्व रेल्वे कार्यालय,बँका,विमा कंपन्या,विमानतळ,पेट्रोलपंप,गॅस कंपन्या यांना अधिकृत राजभाषा मराठीचा १००% आणि सर्वोच्च प्राधान्याने वापर करणे बंधनकारक असताना, रितेश मोर्यने केलेला राजभाषेचा अवमान, दंडेलीचा निषेध यावेळी मराठी एकीकरण समितीने केला. त्यामुळे टीसी मोर्य चे तात्पुरते निलंबन करण्यात आले असून,त्याला कायमस्वरुपी निलंबीत करण्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे