ऑनलाईन जुगार ला प्रोत्साहन देणाऱ्या सचिन तेंडुलकर चे भारतरत्न परत का घेतले जात नाही? जेवढ्या तडका फडकिने बहुजन पोलिसांवर कार्यवाही केली तेवढ्या तडका फडकीने तेंडुलकर वर कार्यवाही का नाही? देशातून हा ऑनलाईन जुगार हद्दपार का केला जात नाही? स्टार पोकरची जाहिरात करणाऱ्या महेंद्र सिंग धोनी हे तर कर्नल लेफ्टनंट धोनी झालेले आहेत. त्यांना का निलंबित केलं जातं नाही. धोनी आणि तेंडुलकर प्रोत्साहन देत नाहीत का? याच उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. ऑल इंडिया पँथर सेना सोमनाथ झेंडे वरील कार्यवाहीचा निषेध करत आहे. सर्वच जुगार उद्धवस्त करा अशी मागणी करत आहे.