कोण आहे अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा कथित प्रियकर? घ्या जाणून..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागा चैतन्यबरोबर घटस्फोट झाल्यानंतर समांथाचं नाव आता लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी समांथा या लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये, त्यानंतर एका पार्टीमध्ये दिसली होती. आता समांथा आणि या दिग्दर्शकाचा तिरुपती मंदिरातील व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे समांथा दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

समांथा रुथ प्रभूचं ( Samantha Ruth Prabhu ) ज्या लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर नाव जोडलं जात आहे, तो आहे राज निदिमोरु ( Raj Nidimoru ). गेल्या काही महिन्यांपासून दोघं नेहमी एकत्र दिसत असतात. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच दोघं तिरुपती मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले. यावेळी एका फ्रेममध्ये न येण्यासाठी समांथा व राज प्रयत्न करताना दिसत आहेत. राज निळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या लुंगीमध्ये पाहायला मिळत आहे. तर समंथा पीच कलरच्या सलवार सूटमध्ये सुंदर दिसत आहे.

समांथा आणि राजच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ओके तर अफवा खऱ्या आहेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “दुसरं लग्न निश्चित झालं.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, समांथाचं दुसरं लग्न लवकरच होणार आहे, असं वाटतं. अशाप्रकारे नेटकऱ्यांनी समांथाच्या दुसऱ्या लग्नाचे तर्क-वितर्क लावले आहेत. पण, समांथा किंवा राजने अजूनपर्यंत त्यांच्या नात्याविषयी कोणतंही भाष्य केलेलं नाही.

राज निदिमोरु कोण आहे?
राज निदिमोरू हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. राजने अनेक सुपरहिट वेब सीरिज केल्या आहेत. मनोज बाजपेयीसह ‘द फॅमिली मॅन’, शाहिद कपूरसह ‘फर्जी’ आणि वरुण धवन-समांथासह ‘सिटाडेल हनी बनी’ यांसारख्या वेब सीरिजसाठी राजने काम केलं आहे. तसंच तो सिनेसृष्टीतही खूप सक्रिय असतो.

‘दरम्यान, ३७ वर्षी समांथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu ) २०१७ मध्ये नागा चैतन्यबरोबर लग्न केलं होतं. पण दोघांचा संसार चार वर्ष पण टिकला नाही. २०२१ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागाने अभिनेत्री शोभिता धुलिपालबरोबर दुसरं लग्न केलं. त्यामुळे आता समांथा देखील दुसरं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

instagram.com/reel/DIn4IErTEJG

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *