क्रिकेट चाहत्यांचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनुसार होणार असल्याचं म्हटंल जात आहे. क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं हा दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबल्याकडे लक्ष असतं. इंडिया-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. मात्र सामन्याला अजून फार वेळ आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांना इंडिया-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 15 डिसेंबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेचं यंदा पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला रविवार 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचं आयोजन हे मलेशियातील क्वालालांपूर येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 6 संघ खेळणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि यजमान मलेशिया हे संघ भिडणार आहेत. या 6 संघांना 3-3 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंकेचा समावेश आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ बी ग्रुपमध्ये आहेत.
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याला 15 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर सामनयाचा थरार अनुभवता येईल.
अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.