काय सांगता ? नागपूरात चोरांनी पळवली चक्क ATM मशीन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

नागपूर जिल्ह्यातील उपरखेडा तालुक्यातील भानेगाव येथे तीन अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली. रात्री पावणे दोन वाजता घडलेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरांनी एटीएम मशीनसोबतच सीसीटीव्ही कॅमेरेही तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 2 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

राज्यात सध्या विविध गुन्ह्यांच्या घटना उघडकीस येत असून मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात तर चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे.गुन्ह्यांच्या वाढत्या घटनामुळे नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यातच तीन चोरट्यांनी नागपूर शहरात केलेल्या कारनाम्याने सर्वच थक्क झाले आहेत. नागपूरमध्ये तीन चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनचीच चोरी करून ते उचकटून घेऊन गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नागपूर जिल्ह्यातील उपरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत भानेगाव येथील घटना आहे. चोरीची ही अफलातून घटना सीसीटीव्ही मध्येदेखील चित्रीत झाली आहे. मात्र यामुळे मोठी दहशत माजली आहे.

सीसीटीव्हीवर मारला काळा स्प्रे आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एटीएम सेंटर मधून चक्क एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी भानेगाव येथे उघडकीस आली. ही घटना रात्री पावणे दोन वाजता घडली असल्याचे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहे. भानेगाव टी पॉइंट पासून पारशिवणी मार्गावर 200 मीटर अंतरावर निलेश राऊत यांचे घर आहे. घराच्या समोर अंगणात वकरंगी कंपनीचे एटीएम मशीन लागले होते.मंगळवारी रात्री दीड वाजता दरम्यान पारशिवनी मार्गाकडून पांढऱ्या रंगाची चारचाकी मालवाहू गाडी निलेश राऊत यांच्या घराजवळ येऊन थांबली. गाडीतून तीन व्यक्ती उतरले आणि एटीएम मशीन जवळ आले.

त्यांनी एटीएम मशीन मध्ये आणि एटीएम मशीन रूम मध्ये लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर काळया रंगाच्या स्प्रे मारला. तर निलेश राऊत यांच्या घरी लागलेला कॅमेरा बंद करण्यासाठी चोरांनी वायर कापली. मात्र ती वायर बंद असलेल्या लाईटचा होता. चोरांना वाटले की कॅमेरा बंद झाला. तिन्ही चोरांनी एटीएम रूम मध्ये जाऊन एटीएम मशीन उचलून चार चाकी मालवाहू गाडीत लोड केली. त्या मालवाहू गाडीत आधीच एक गाडी चालक बसला होता. चौघेही त्या गाडीत बसून एटीएम मशीन पारशिवणीच्या दिशेने घेऊन गेले.

हा सर्व चोरीचा प्रकार निलेश राऊत यांच्या घरी लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बुधवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकिंगसाठी जात असताना त्यांना एटीएम मशीन दिसलं नाही. एटीएम मशीनची किंमत 2 लाख 10 हजार रुपये असून, एकूण 2 लाख 52 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.त्यामुळे त्यांनी जागरूकतेने 112 वर कॉल केला आणि एटीएम मशीन चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *