भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो बऱ्याच काळापासून अवकाशात भारताकडून अवकाशवीर पाठवण्यासाठी काम करत आहे. अलीकडेच सरकारने यासाठी मिशन 2040 ची तयारी केली आहे. मिशन गगनयानच्या माध्यमातून भारत अवकाशात मानव पाठवण्यासाठी काम करेल. हे काम करण्यासाठी इस्रो वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. आता त्यांच्याहाती यश लागलं आहे. इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ आला आहे.
इस्रोने 29 नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली. या टेस्टमध्ये क्रायोजेनिक इंजिन रि-स्टार्ट करुन पाहण्यात आलं. ही टेस्ट गगनयान मिशनसाठी खूप आवश्यक आहे. मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. Launch Vehicle Mark-3 (LVM-3) ला अपर स्टेजमध्ये पावर मिळते. मानवाला अवकाशात पाठवण्याची मोहीम यामुळेच यशस्वी होईल.
गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरणार
CE20 क्रायोजेनिक इंजिनचा विकास स्वत: इस्रोने केला आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरने हे इंजिन डेवलप केलय. हे इंजिन 19 टनाच थ्रस्ट लेवल ऑपरेट करु शकते. आतापर्यंत या इंजिनने सहा एलवीएम-मिशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. अलीकडेच या इंजिनला अपडेट करुन 20 टन कॅपेसिटीच बनवण्यात आलं आहे. गगनयान मिशनमध्ये हे इंजिन वापरण्यात येईल. आता हे 22 टनापर्यंत वाढवण्यात आलं आहे. क्रायोजेनिक इंजिनशिवाय मानवाला अवकाशात पाठवणं शक्य नाहीय.