मेष
मेष राशीच्या लोकांना हा आठवडा आनंदाचा असणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कमिशन आणि मार्केटिंगमध्ये गुंतलेल्या लोकांना वेळेवर टार्गेट पूर्ण करावे लागेल. महिलांचा कामाता ताण वाढू शकतो. तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील. संचित संपत्तीत वाढ होईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलदायी होतील. एखाद्याला पैसे देणे टाळा. गुंतवणुक करणे टाळा. प्रेमसंबंधात हा आठवडा अनुकूल राहिल. लव्ह पार्टनरसोबत प्रेम सौहार्द राहिल, वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृषभ
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहिल. मित्राच्या सल्ल्याने किंवा मदतीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. मालमत्तेशी संबंधित कामात येणारे अडथळे दूर होतील. सत्ता आणि सरकारच्या सहकार्याने तुम्हाला फायदा होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल. खूप दिवसांपासून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होईल. नवीन कामाच्या सुरुवातीमुळे मनात उत्साह राहिल. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ शुभ असेल. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. धार्मिक पर्यटन स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा. घाईने कोणतेही पाऊल उचलू नका.
मिथुन
हा आठवडा तुमच्यासाठी चढ-उतारांचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाशी संबंधित काही आव्हाने तुमच्या समस्यांचे प्रमुख कारण बनतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना या काळात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. नोकरदार लोकांवर अचानक कामाचा बोजा वाढेल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मन थोडे अस्वस्थ राहिल. तुम्ही स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. मोठी चूक केल्यास आपल्याला पश्चाताप करावा लागेल. या आठवड्यात फालतू खर्च टाळा. कोणत्याही गोष्टीवर शहाणपणाने पैसे खर्च कराल. फालतू खर्च भविष्यात आर्थिक समस्यांचे प्रमुख कारण बनेल. प्रेमसंबंध सुधारण्यासाठी लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. वैवाहिक जीवनासाठी, तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढा.
कर्क
हा आठवडा तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हीची काळजी घेणारा असेल. हवामान बदलामुळे शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाचाही गैरवापर करणे टाळा. नात्यात दूरावा येऊ शकतो. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासादरम्यान आरोग्य आणि सामानाची विशेष काळजी घ्या. या आठवड्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागेल. दुखापत होण्याची शक्यता आहे. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. पैशाचे व्यवहार आणि व्यवसायाचा विस्तार अतिशय विचारपूर्वक करा. परेदशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहिल. जोडीदारासोबत वाद घालू नका.
सिंह
हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देणारा असेल. काही मोठी समस्या सोडवून रखडलेली कामे पूर्ण कराल. व्यावसायिक लोकांना या आठवड्यात अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. व्यवसाय संथ गतीने होत असला तरी नफा मिळेल. मालमत्तेशी संबधित वाद मिटले जातील. या आठवड्यात तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यात चांगला परिणाम देईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. उत्पन्नासोबत खर्चही वाढेल. लांबच्या प्रवासातून फायदा होईळ. तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ मौजमजेमध्ये जाईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेम जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कन्या
हा आठवडा तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन करावे लागेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आयुष्यात अचानक मोठी समस्या आल्याने मन अस्वस्थ राहिल. जवळच्या मित्राच्या मदतीने कामात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाल्यामुळे ध्येय साध्य करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. व्यवसायातून कमी नफा मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचे मन विचलित होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. जीवनातील चढ-उतारांदरम्यान जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तुळ
तुळ राशीच्या लोकांसाटी हा आठवडा आनंदाचा असेल. जवळचे मित्र किंवा कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. धार्मिक स्थळी जाऊ शकता. प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असेल. नोकरदार लोकांना नवीन आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील. पदोन्नती किंवा बदली सारख्या कामातील अडचणी दूर होतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. लोकांचा सन्मान मिळेल. नशिबाच्या पाठिंब्याने तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वप्न साकार होतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृश्चिक
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असेल. एखाद्या गोष्टीबाबत चिंतेत असाल.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या चिंतेचे कारण बनेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही त्यावर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल नसेल. या काळात व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कामात मेहनत केल्यावर यश मिळेल. प्रेमसंबंधात समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराशी संवाद साधा. सुखी वैवाहिक जीवनासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा
धनु
हा आठवडा तुम्हाला शुभ आणि सौभाग्य देणारा आहे. तुमच्या वाणीने आणि बुद्धीने तुम्ही खूप मोठे काम करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना कामात मोठे यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. संचित संपत्ती वाढेल. चैनीच्या गोष्टींवर पैसा खर्च होईल. गुंतवणुकीतून अचानक मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. काम करताना शरीराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. खाण्याच्या सवयी योग्य ठेवा. स्त्री मैत्रिणीच्या मदतीने प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र असेल. आठवड्याची सुरुवात शुभ आणि लाभदायक राहिल. काही समस्यांना सामोरे जावे लागेल. अचानक लांबच्या प्रवासाला जावे लागेल. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल. मन सतत चिंतेत राहिल. घाईगडबडीत किंवा गोंधळात निर्णय घेणे टाळा. कुटुंबात वाद होतील. नातेवाईकांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे नसेल. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागेल. पैसे गुंतवणे टाळा, नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा
कुंभ
हा आठवडा कामात यश मिळविण्यासाठी खूप संयम आणि विवेकाची आवश्यकता भासेल. नुकतेच काही काम सुरु केले असेल तर त्यात यश मिळेल. संयमाने कष्ट करावे लागतील. अनावश्यक कामात व्यस्त राहू शकता. छोटेसे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून हा काळ योग्य नाही. पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी. प्रेमसंबंधांच्या बाबतीत वेळ सामान्य राहणार आहे. लव्ह पार्टनरची साथ तुम्हाला कठीण काळात मदत करेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मीन
हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी असेल. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. परदेशात तुमच्या करिअर आणि व्यवसायाठी प्रयत्न करत असाल तर मोठे यश मिळेल. घर आणि ऑफिसमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. घरात आनंदाचे वातावरण राहिल. बाहेर फिरण्याचा प्लान कराल. समाजसेवत असणाऱ्यांचा सन्मान केला जाईल. किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्य सामान्य राहिल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. प्रेमसंबंधात परस्पर विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.