लेखणी बुलंद टीम:
मेष
दिनांक ११, १२ हे दोन दिवस बेताचे आहेत असे समजा. म्हणजे या दिवसांत कोणतेही काम करताना जबाबदारीने करा. इतरांनी केले म्हणून तुम्ही करू नका. कारण तुम्हाला ते त्रासाचे ठरू शकते. सध्या वेळ चांगली नाही असे गृहीत धरून दिवस पुढे ढकला म्हणजे त्रास होणार नाही. शिवाय तुम्हाला जे करायचे आहे ते चांगल्या दिवसांत करा. पौर्णिमा कालावधीत शांतता पाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात आत्तापर्यंत ज्या गोष्टींना चालढकल करत होता, त्या गोष्टी समोर येतील आणि त्यावर निर्णय घ्यावा लागेल. नोकरदार वर्गाला चांगले काम मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. मुलांची प्रगती होईल. प्रकृतीविषयक असलेल्या तक्रारींकडे लक्ष द्या.
वृषभ
सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. अगदी सहज मार्गी कामे होत राहतील. तुम्हाला असे वाटेल की, इतक्या दिवस ज्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न करत होतो, त्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. सध्या मात्र यश मिळणारे आहे. अपेक्षा पूर्ण होतील. इतरांची मदत वेळेत मिळेल. काम करण्याचा उत्साह वाढेल.
मिथुन
ज्या वेळी शुभ ग्रहांची साथ उत्तम असते. त्या वेळी नवीन कल्पना सुचतात हे मात्र नक्कीच आणि त्या यशस्वीही होतात. त्याचा आनंद तुम्हाला असेल. आतापर्यंतच्या गोष्टींना उशीर लागत होता तो आता लागणार नाही. काय करावे काय करू नये, अशी जी द्विधा अवस्था होत होती ती आता होणार नाही. हालचालींना वेग येईल. ठामपणे निर्णय घ्याल आणि निर्णय स्वत:च्या हिमतीवर घ्याल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात आवकजावक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांशी कामासंदर्भात मार्गदर्शन घ्यावे लागेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील. समाजसेवेची आवड असली तरी सध्या वेळ देता येणार नाही.
कर्क
सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे तुम्हाला काय करावे आणि काय करू नये असेच होईल आणि चांगल्या गोष्टीचा श्रीगणेशा व्हायला उशीर लागणार नाही. मग आता वाट कशाची पाहता कामाला लागा. स्वत:चे काम स्वत: करायचे इतरांवर अवलंबून राहायचे नाही. हा अनुभव काही दिवसांपूर्वी तुम्हाला आलेला होता, त्यामुळे तुम्ही आता सतर्क राहून काम करा. जिद्दीने कामे पूर्ण करा, तरच समीकरण जुळून येईल. व्यवसायात भागीदारी करार सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. तो आता करावा लागणार नाही.
सिंह
दिनांक ६, ७ हे दोन दिवस अनुकूल नाहीत, त्यामुळे या दिवसांत येणारे प्रस्ताव त्रासाचे असतील. तेव्हा कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्या म्हणजे नुकसान होणार नाही. इतरांनी केलेले मार्गदर्शन तुम्हाला आवडणार नाही. अशा वेळी समोरच्याचे ऐकून घ्या, मात्र त्यावर प्रतिक्रिया देऊ नका म्हणजे वाद होणार नाही. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. नियमांचे पालन करा. इतरांचे बोलणे मनावर घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. पौर्णिमा कालावधीत पैशांचे व्यवहार जपून करा. व्यवसायात इतरांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाला कामाचे योग्य असे नियोजन करावे लागेल. सार्वजनिक ठिकाणी परिस्थितीनुसार निर्णय घ्या. जोडीदाराची मदत मिळेल. कुटुंबाला सांभाळून घ्या.
कन्या
दिनांक ८, ९, १० असे तीन दिवस चढउतारांचे आहेत. या दिवसांत नको तो व्याप मागे लागू शकतो. कारण नसताना गोष्टी अंगलट येऊ शकतात, त्यामुळे बोलताना दोन शब्द कमी बोला. तुमचे मत चांगले जरी असले तरी ते इतरांना पटणारे नसेल. त्यामुळे न बोललेले केव्हाही चांगले. त्यापेक्षा आपले काम भले आणि आपण भले हेच सूत्र लक्षात ठेवा. रागाच्या भरात धाडसी निर्णय घेणे टाळा म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. हा दिवस शुभ राहील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाचे काम चोख राहील. आर्थिक व्यवहार मात्र जपून करा. स्वार्थी मैत्रीपासून दोन हात लांब राहा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. नाही पटला तर वाद घालू नका. प्रकृती जपा.
तूळ
दिनांक ११, १२ या दोन दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही. तेव्हा या दिवसांत महत्त्वाचे कोणतेही करार करू नका. करार करण्यासाठी चांगले दिवस असतील त्या दिवसांचा विचार करा. बचावात्मक धोरण ठेवा म्हणजे नुकसान होणार नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या मनाविरुद्ध घडल्यामुळे पटकन राग येतो आणि हे सहाजिक आहे. मात्र इथे संयम ठेवणे गरजेचे आहे. कारण हा संयमच तुम्हाला यश मिळवून देणार आहे हे लक्षात ठेवा. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायातील व्यवहार करताना जबाबदारीने वागा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींना महत्त्व देऊ नये. आर्थिक उधारी करणे टाळा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. ज्येष्ठांचा आदर करा. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण खरंच भाग्योदय करणारे आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण बऱ्याच दिवसांतून असा कालावधी आलेला आहे. काही दिवसांपासून जो मानसिक ताण-तणाव येत होता तो आता येणार नाही. कारण तुम्हाला ज्या गोष्टी वेळेत व्हाव्या अशा वाटत होत्या त्या व्हायला उशीर लागणार नाही, त्यामुळे तुमचा उत्साह टिकून राहील. इतरांना मदत करण्याचा हेतू साध्य होईल. स्वत:चे कामही वेळेत होईल. पौर्णिमा कालावधी लाभाचा असेल व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाला चांगल्या कामाबद्दल वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांसोबत करमणुकीचे बेत आखाल. भावंडांशी संवाद साधाल. धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य ठणठणीत राहील.
धनु
दिनांक ६, ७ हे दोन दिवस चांगले कसे जातील ते पाहा. कारण या दोन दिवसांत तुम्हाला अपेक्षा नसतानाही अशा गोष्टी समोर येतील की त्यातून वाद निर्माण होईल आणि तुमची मानसिकता गप्प राहण्याची नसेल. परिणामी वाद वाढू शकतो. तेव्हा स्वत:वर नियंत्रण ठेवायला शिका. गोष्टी चुकीच्या जरी असल्या तरी सध्या त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. थोडे शांत घ्या म्हणजे घडी विस्कळीत होणार नाही. इतरांनी काय करावे काय करू नये याचा विचार सध्या करू नका. बाकी कालावधी चांगला असेल. पौर्णिमा ठीक राहील. व्यवसायात स्वत: जबाबदारीने काम केल्यास नुकसान होणार नाही. नोकरदार वर्गाने कामाचे वेळापत्रक तयार करावे. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल. नातेवाईकांची ऊठबस करावी लागेल. कुटुंबाची काळजी घ्या. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
मकर
दिनांक ८, ९, १० हे तीन दिवस जपून पाऊल टाका. कारण या दिवसांत काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या रागाचा पारा चढेल. समोर कोण आहे कोण नाही याचा विचार न करता तुम्ही स्पष्ट बोलाल, पण त्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्पष्टवक्तेपणा टाळा. अबोला धरलेला केव्हाही चांगला हे लक्षात ठेवा. आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. कामात व्यस्त राहिलेले चांगले राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.
कुंभ
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. या ग्रहमानात नेमके काय होते की तुमची मानसिकता नेहमी द्विधा अवस्थेची राहते. चांगले काम करायचे असते त्या वेळी तुम्ही प्रयत्न करत नाही आणि ज्या वेळी थांबण्याची वेळ असेल त्या वेळी मात्र तुम्ही फार घाई करता आणि तुमचे नुकसान होते. चांगल्या गोष्टींचा प्रयत्न सोडू नका. इतरांवर अवलंबून राहू नका, त्यामुळे त्रास होणार नाही. वादविवादांपासून दूर राहा. पौर्णिमा कालावधीत सहनशीलता वाढवावी लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. व्यसनी मित्रांपासून लांब राहा. कुटुंबाची काळजी घ्या. मानसिकता जपा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.
मीन
दिनांक ८, ९, १० या तीन दिवसांत घाई गडबडीने कोणतेही काम करू नका. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. चांगल्या कामासाठी उशीर झाला तरी चालेल, पण ते काम चोख करा. सकारात्मक गोष्टींचा विचार करा, त्यामुळे गोष्टी चांगल्या घडतील. एखादी गोष्ट उशिरा झाली म्हणून वाईट वाटून घेऊ नका. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा ठेवूच नका. कोणावर अवलंबून राहिल्यास काम नीट होणार नाही. तेव्हा प्रत्येक कामाचे व्यवस्थापन नीट करा. पौर्णिमा कालावधी चांगला राहील. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायात काही बदल करावे लागले तर ते विचारपूर्वक करा. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजसेवा करावीशी वाटली नाही तरी करावी लागेल. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींना आपले मत तर्काने पटवून द्याल. प्रकृतीची काळजी घ्या.