साप्‍ताहिक राशिभविष्य 30 सप्टेंबर to 6 ऑक्टोबर 2024 

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

मेष

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठिक आहे, खास करून आर्थिक घडामोडी जास्त होणार आहेत. या आठवड्यात तुम्ही केलेला प्रवास यशस्वी होणार असून त्यातून तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबात वातावरण चांगले असून सेलिब्रेशनचे आयोजन होण्याची शक्यता आहे. ऑफिस आणि व्यवसायात निर्णय घेताना नीट विचार करा, त्यामुळे भविष्यात चांगला लाभ होईल. खर्च वाढण्याची शक्यता आहे तेव्हा काळजी घ्या. अती ताणामुळे थकवा जाणवेल त्याचबरोबर अंगदुखी वाढण्याची शक्यता आहे तेव्हा काळजी घ्या.

वृषभ
या आठवड्यात करिअरच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे. तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे काम व्यवस्थित मार्गी लागेल. प्रवासात चांगाल अनुभव येईल आणि या आठवड्यातील प्रवास लाभदायक असेल. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या लहान सदस्याची तब्येत बिघडू शकते काळजी घ्या. तुमच्या तब्येतीकडे आवर्जून लक्ष द्या. कुटुंबात झालेला बदल तुमच्यासाठी सकारात्मक नसेल त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धी प्राप्त होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा ठिक असून कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. तुम्हाला दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी नवीन रणनीतीचा वापर करावा लागेल, त्यासाठी तयार राहा. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. तुमचे सहकारी फारशी मदत करणार नाहीत, त्यामुळे तुमचा अपेक्षा भंग होईल. या आठवड्यात प्रवास करू नका. कुटुंबात समाधानी वातावरण राहाण्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील.या आठवड्यात तुम्ही शॉपिंगमध्येही व्यस्त असाल. आठवड्याच्या शेवटी अशी काही बातमी येईल त्यामुळे तुम्हाला दुःख होवू शकते.

कर्क 

कर्क राशीसाठी हा आठवडा चांगला आहे तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक पेंडींग पेमेंट होणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी वेळ उत्तम आहे आणि तुम्हाला दुप्पट नफा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या तसेच फिटनेस एक्टिविटीकडे मन वळू शकते. प्रवास सफल होणार आहे प्रवासात एखाद्या तरुणाकडून मदत मिळेल. कुटुंबात तसे पाहिले तर सगळे काही ठिक आहे पण थोडी धुसफूस आहे असे वाटेल. ऑफिसमध्ये एखाद्या महिलेमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी स्थिती सुधारणार आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला लाभ होणार आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. आर्थिक बाबतीत स्थिती चांगली आहे तसेच धनलाभाचा योग असून व्यवसायात नफा होईल. जोडीदारामुळे थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे आणि ज्या कारणासाठी प्रवास करत आहात त्यात सफलता मिळेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यात सहभाग घेणार आहात. धावपळ आणि दगदग जास्त झाल्यामुळे एकांतात वेळ घालवायला आवडेल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसायाच्या बाबतीत उत्तम आहे. तुमची तब्येत बिघडलेली असेल तर त्यात सुधारणा होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार असून तुमच्या प्रेमात बहार येईल, त्यासाठी कोणाकडून तरी तुम्हाला मदत मिळेल. कार्यक्षेत्रात थोडे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावा. घरात काही तणाव सुरु असेल तर संवादाद्वारे तो दूर करण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहात त्यात संयम गरजेचा आहे.

तुळ
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून आर्थिक बाबतीत शुभयोग आहेत. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. तब्येतीत सुधारणा होणार आहेत तुम्ही उत्तम आरोग्यासाठी खाण्यापिण्यात बदल करण्याची शक्यता आहे. ऑफिसच्या कामाच हळूहळू प्रगती होणार आहे. प्रवासात फार लाभ होणार नाही त्यामुळे प्रवास पुढे ढकलणे उत्तम आहे. कुटुंबात अशी काही बातमी येईल ज्यामुळे तुमचे मन दुःखी होवू शकते. तुम्ही दिवसेंदिवस कामात खूप व्यस्त होणार आहात.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक प्रगतीने भरलेला आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहेत. प्रवासात तुमचे भांडण होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवास टाळणे उत्तम आहे. कुटुंबातील आईसमान महिलेबद्दल तुम्हाला काळजी वाटणार आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुमची खूप धावपळ होणार आहे. खर्च जास्त आहे तेव्हा पैशांची सोय करुन ठेवा. करिअर आणि व्यवसायात कामे वाढत आहे त्याकडे फोकस करा.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरच्या बाबतीत अतिशय उत्तम आहे. ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होणार आहे. मानसन्मान वाढणार आहे. एखादा चांगला प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. आर्थिक स्थिती उत्तम आहे तसेच बँक बॅलन्स वाढतो आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगली आहे. प्रवासात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. लवलाइफ उत्तम असून संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबाता वातावरणम सकारात्मक असेल. आठवड्याच्या शेवटी तरुण व्यक्तीमुळे तुम्ही उदास व्हाल.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून आर्थिक बाबतीत सुखद समाचार मिळणार आहेत. तुमच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होणार आहे. मुलांमुळे घरातील वातावरण हसते खेळते असेल. ऑफिसमध्ये नवा प्रोजेक्ट मिळेल पण तुम्ही थोडे दुःखी असाल. ऑफिसमधील युवा पिढीसोबत काम करताना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धीचे योग आहेत. तसेच एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात होणार आहे, ती तुमच्यासाठी सकारात्मक असेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअर संदर्भात अतिशय चांगला आहे. तुमचा मानसन्मान होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे. बिजनेस निमित्त तुम्ही केलेला प्रवास यशस्वी होणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये चढउताराचा सामना करावा लागेल. युवा पिढीकडून खर्च जास्त होणार आहे. प्रवासात शुभलाभाचे योग आहेत. लवलाइफमध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे त्रास वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील पितृतुल्य व्यक्तीमुळे तुमचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून कार्यक्षेत्रात तुमची प्रगती आहे. तुम्ही केलेल्या कामात यश मिळणार आहे तसेच सगळीकडे तुमचे कौतुक होणार आहे. कुटुंबात सुखसमृद्धीचे योग आहेत तसेच वातावरण समाधानी असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे त्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. महिलेमुळे खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या अन्यथा दातांची समस्या होवू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे तसेच सेलिब्रेशनचा योग तयार होतो आहे.

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *