साप्ताहिक राशिभविष्य (23 to 29 September 2024)

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधात समस्यांना सामोरे जावे लागेल. कोणत्या तरी गोष्टीमुळे जोडीदारासोबत वाद होतील. तुम्ही खूप अस्वस्थ व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अचानक तुमच्यासाठी अनुकूल राहिल. तुमचे मन प्रसन्न राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

वृषभ-हा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आनंददायी राहिल. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर प्रेम वाढेल. प्रेम जीवनात सुख- समृद्धी वाढेल. जुन्या आठवणी नव्याने ताज्या होतील. जोडीदाराकडे लक्ष द्याल. तुमच्यासाठी हा काळ आनंद आणि समृद्धीचा असेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मिथुन –मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत खूप आनंददायी असेल. आठवड्याच्या सुरुवातीला प्रणय तुमच्या प्रेम जीवनात प्रवेश करेल. प्रेमसंबंध दृढ होतील. यात तुम्ही सुख-समृद्धी असाल. जोडीदारासोबत प्रेमात एक पाऊल पुढे टाकाल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक कराल.

कर्क-कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तुम्हाला नात्यात काही गोष्टी ठीक वाटणार नाही. जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्दयावरुन भांडण होईल. त्यांना पुन्हा विचार करण्यास भाग पाडाल. प्रेम जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतेही निर्णय संयमाने घेतल्यास फायदा होईल. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणू नका.

सिंह-सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधांच्या बाबतीत चांगला राहिल. कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप नात्यातील अंतर वाढवेल. आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ अनुकूल असेल. प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील. तुमचे मत जोडीदारासोबत उघडपणे मांडाल. दोघांचा वेळ चांगला जाल.

कन्या-कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. जोडीदारासोबत हा आठवडा आनंदात जाईल. बाहेर फिरण्याची योजना कराल. प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळतील. नात्यातील परस्पर प्रेम वाढेल. जोडीदारासोबत प्रामाणिक राहाल.

तुळ –तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लव्ह लाईफच्या दृष्टीने आनंददायी ठरेल. प्रेमसंबंधात वेळ अनुकूल राहिल. सुरुवातीला प्रेम जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तीत्त्वाने प्रभावित कराल. नात्यात संतुलन राखले जाईल. प्रेम जीवनावर लक्ष केंद्रित केले तर चांगले होईल.

वृश्चिक-वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत चढ-उतारांचा असेल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात अडचणी वाढतील. तुमचे मन काही गोष्टींमुळे अस्वस्थ राहिल. संवादाने समस्या सोडवल्या जातील. जीवनात आनंदाचे दार ठोठावेल. कुटुंबातील कोणीतरी तुमच्या प्रेमजीवनाबद्दल चर्चा करेल.

धनु-धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमसंबंधात गोंधळात टाकणारा असेल. प्रेम संबंधातील परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असेल. संयमाने परिस्थितीचा आढवा घेतला तर निर्णय घेणे चांगले राहिले. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रेम जीवनात चांगली बातमी आठवड्याच्या शेवटी मिळेल.

मकर-मकर राशीच्या लोकांचे प्रेम जीवन या आठवड्यात तणावपूर्वक असेल. अनावश्यक गोष्टींवरुन जोडीदाराशी वाद होतील. हा आठवडा तुमच्या प्रेमसंबंधात अडचणी आणणारा आहे. तुमच्या लव्ह लाईफबद्दल थोडे असमाधानी असाल. दिलेली आश्वासने पूर्ण होणार नाहीत. बॅकअप प्लान बनवून तुम्ही कोणत्याही निर्णयावर पोहोचलात तर बरे होईल.

कुंभ-कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येतील. प्रेम जीवनात आनंदाचे दार ठोठावेल. ही वेळ अनुकूल असेल. नात्यात समंजसपणा वाढेल. जोडीदाराच्या बोलण्याने तुम्हाला दिलासा मिळेल. तुमचे मन खूप आनंदी असेल. आनंदात वाढ होईल.

मीन-मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. तुम्हाला प्रेमात अधिक प्रयत्न करावे लागतील. या आठवड्याच्या सुरुवातीला सकारात्मक परिणाम मिळतील. प्रेम जीवनात आनंदी असाल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना कराल.

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *