मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती आणि कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. या आठवड्यात गुंतवणुकीसाठी निर्णय घेताना खूप विचार करणे गरजेचे आहे. तब्येतीत सुधारणा होतील. जीवनात सुख शांती समाधान मिळेल. या आठवड्यात प्रवास टाळा आणि आर्थिक खर्चात वाढ आहे. आठवड्याच्या शेवटी घरातील तरुण सदस्य तुमचे टेन्शन वाढविणार आहे.
वृषभ
हा आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीने भरलेला असेल. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरपूर फायदा आहे. कुटुंबातील वरिष्ठांच्या मदतीने जीवनात शांततेची अनुभूती असले. या आठवड्यात तुम्ही प्रियजनांसोबत प्रवास करण्याचा विचार करू शकता, आणि प्रवासाता जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. या आठवड्यात खर्च जास्त होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.
मिथुन
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा हा आठवडा ठिक असून प्रवासात तुम्हाला यश मिळेल. प्रवासात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्यात सुधार होईल फक्त पथ्य व्यवस्थित सांभाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेमसंबंधात अहंकार आणू नका, नाते बिघडू शकते. आर्थिक बाबतीत थोडी निराशा आहे पण गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नका. कार्यक्षेत्रात महिलेमुळे त्रास वाढू शकतो. कुटुंबात एखाद्या सदस्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस वेळ अनुकूल असून सुख-समृद्धीचे योग आहेत.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असून तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमचे ऑफिसमध्ये कौतुक होईल. या आठवड्यात तुमची काम वाढणार असून तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. आर्थिक स्थिती उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. भागीदारीत केलेली गुंतवणुक लाभदायक असेल.आरोग्यात सुधारणा होणार आहे पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. तब्येतीच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.प्रेमजीवनात सुखद अनुभव आहेत. प्रवासासाठी वेळ उत्तम आहे. आठवड्याच्या अखेरीस कोणतीतरी बातमी मन दुखवू शकते.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारसा ठिक नाही. ऑफिसच्या कामात एखाद्या महिलेमुळे त्रास होवू शकतो. प्रेमसंबंधात प्रॅक्टिकल निर्णय घेणे चांगले असेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढणार आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे फसवणूक होऊ शकते, सावध राहा. प्रवासात त्रास आहे त्यामुळे प्रवास पुढे ढकलणे उत्तम आहे. आठवड्याच्या अखेरीस सुख-समृद्धीचे योग असून कामात प्रगती होईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. तब्येत चांगली राहणार आहे. प्रवासामुळे काही अडचणी येऊ शकतात. आयुष्यात दुरावा निर्माण झालाय असे वाटेल. कार्यक्षेत्रात हा आठवडा कठीण असून प्रोजेक्ट पूर्ण करताना अडचणी येतील. कुटुंबाच्या बाबतीत एकटेपणाची भावना होईल आणि मन अस्वस्थ राहील. आठवड्याच्या शेवटी वादविवाद टाळावा.
तुळ
तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला असून धनलाभाचे योग आहेत. तब्येत सुधारते आहे, पथ्यपाणी सांभाळा. प्रवासाता त्रासाची शक्यता असून प्रवास कमी करावा. कुटुंबात मतभेद वाढू शकतात. तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. ऑफिसच्या कामात अडचणी येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी ताणतणाव वाढेल तो कमी करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून अडचणींनी भरलेला आहे. कोणत्याही कामाबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा अडचणी वाढू शकतात. काही प्रोजेक्ट तुमची डोकेदुखी वाढवणार आहेत. प्रवासाचा योग आहे पण काही कारणामुळे त्रासाची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी काही वाईट बातम्या मिळू शकतात.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत सुखद आहे. धनलाभाचे उत्तम योग आहेत. आरोग्या सुधारणा दिसते आहे तसेच उत्तम आरोग्यासाठी काही नवीन सुरुवात करणार आहात. लवलाइफ ठिक असले. या आठवड्यात प्रवासात यश मिळेल तसेच जुन्या आठवणींना उजाळा द्याल. कार्यक्षेत्रात थोडा त्रास आहे पण समस्या सुटतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही टेन्शन घेणार आहात. आठवड्याच्या अखेरीस कामात यश मिळेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असून प्रत्येक कार्यात यश मिळेल. कुटुंबाचा पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. जीवनात सुख-समृद्धी येईल. ऑफिसच्या कामात यश आहे पण कठोर मेहनत करावी लागेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि मन आनंदी असेल. प्रवासाच्या दरम्यान चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या शेवटी थोडा आळस जाणवेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असेल. ऑफिसमध्ये तुम्ही काही नवीन गोष्टी करण्याचा विचार कराल. प्रोजेक्ट यशस्वी होतील. व्यवसायात उत्तम नफा आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुम्ही खुष असाल. प्रवास सुखाचा असेल. खर्च मात्र होणार आहे. आठवड्याच्या शेवटी सुख-समृद्धीचे योग आहेत.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असून धनलाभाचे योग आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच पैशांबद्दल चांगली बातमी मिळेल. तब्येतीत सुधारणा असेल. कुटुंबाला चांगला वेळ द्याल. या आठवड्यात प्रवास न करणे चांगले ठरेल. व्यवसायात काम येते आहे पण नियोजन महत्तवाचे आहे. आठवड्याच्या शेवटी पार्टी करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला नक्की संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)