लेखणी बुलंद टीम:
मेष
सध्या सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. प्रत्येक गोष्टीत आपले तेच खरे करण्याची वेळ आली आहे. जे निर्णय आत्तापर्यंत लांबत जात होते तसे आता होणार नाही. कामाला गती येईल. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होईल. म्हणजेच सध्या वाटचाल सुरळीत चालणार आहे. याचे संकेतही आपल्याला मिळत आहेत हेही तितकेच सत्य. व्यवसायातून अपेक्षित लाभ होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची बोलणी खावी लागली तरी चालेल, मात्र आपली भूमिका स्पष्ट ठेवा. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाल. राजकीय क्षेत्रातील हालचालींना वेग येईल. कुटुंबाशी मिळूनमिसळून राहण्यातच आनंद असतो हे विसरू नका. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मनोबल वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ
प्रत्येक आठवड्यात असा एक तरी दिवस असतो की, हे करू नका ते करू नका. संयम ठेवा इतरांच्या मर्जीने वागा. सध्या यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला लागू होणार नाही. तुम्हाला तुमच्या मर्जीने जगता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला अपेक्षाही नसेल अशा गोष्टी तुमच्यासमोर येतील आणि या गोष्टीतूनच मिळणारा आनंद द्विगुणित करणारा असेल. कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. कामातील उत्साह टिकून राहील. व्यावसायिक नफा वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचे वेळापत्रक करता येईल. आर्थिक चिंता मिटेल. समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळेल. नातेवाईक, शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहिलेले चांगले. धार्मिक कार्याची आवड राहील.
मिथुन
दिनांक १७ रोजीचा एकच दिवस फारसा अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगल्या कालावधीत गती येईल. जे काम हाती घ्याल ते काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ज्या गोष्टीचा ताळतंत्र बसत नव्हता, तो बसण्याच्या मार्गी असेल. जबाबदारी घेणे आणि पार पाडणे यात फरक असतो. सध्या हीच जबाबदारी पार पाडण्यात यश मिळणार येईल व्यवसायात परिश्रम वाढले तरी फायद्याचे प्रमाणही वाढणार आहे. नोकरदार वर्गाला घाईने कोणतेही पाऊल उचलून चालणार नाही. टप्प्याटप्प्याने प्रयत्न वाढवा. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात असलेला दुरावा कमी होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबाला वेळ द्या. प्रकृती उत्तम राहील.
कर्क
दिनांक १८, १९ या दोन दिवसांत येणारे प्रस्ताव फसवणुकीचे असू शकतात. या प्रस्तावाला बळी पडू नका. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय त्रासाचे ठरू शकतात. तेव्हा कोणत्याही गोष्टीचा विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. इतरांनी केले म्हणून आपण करावे हा विचार प्रथमता बाजूला ठेवा. सध्या व्यवहारी राहणे हीच मोठी शिदोरी असेल. तेव्हा वेळीच सावध व्हा. न जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून मनासारखे उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाचा कामातील अनुभव चांगला असेल. समाजसेवेची आवड राहील. जोडीदाराच्या विचाराने पुढे जा. म्हणजे वाद होणार नाहीत. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.
सिंह
दिनांक २०, २१, २२ हे तीन दिवस संघर्षाचे आहेत असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे याच दिवसांत तुम्ही नको त्या गोष्टींचा व्याप वाढवून घ्याल. ज्या गोष्टीतून त्रास होणार आहे अशा गोष्टींच्या नादी लागू नका. कोणतेही काम करताना दूरदृष्टी ठेवा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. स्वत:चे काम स्वत: करा. वादविवादांपासून लांब राहा. धरसोड वृत्ती टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात खरेदी- विक्रीचे व्यवहार करताना भान ठेवा. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मित्र-मैत्रिणींशी मनमुराद गप्पा माराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करा. योग साधनेला महत्त्व द्या.
कन्या
दिनांक २३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या कालावधीत कोणतीही गोष्ट अडथळ्यांची नसेल. सहज अगदी वेळेत काम पूर्ण होईल. कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. सध्या आपले मत इतरांना पटणारे असेल. स्वत:च्या जबाबदारीवर घेतलेले काम पूर्ण कराल. आतापर्यंत व्यवसायात चढ-उतार जाणवत होता. सध्या हा चढ -उतार जाणवणार नाही. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाने वेळेत काम केल्याबद्दल वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. आर्थिक लाभ होईल. सर्वांगीण विकास घडेल. भावंडांना मदत कराल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ
दिनांक १७ तारखेचा एकच दिवस शुभ नाही. बाकी सर्व दिवस शुभ आहेत. चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानात होत आहे. असे ग्रहमान म्हणजे एक प्रकारची संधी असते हे लक्षात ठेवा. ही संधी वाया घालवू नका. अनेक मार्गांतून प्रस्ताव येतील. तुमच्या कामाचा भार हलका होणार आहे, त्यामुळे उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायात दुहेरी लाभ होईल. नोकरदार वर्गाची अडचणीतून सुटका होईल. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घ्याल. मित्र-मैत्रिणींशी संबंध दृढ होतील. संततिसौख्य लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. भावंडांशी संपर्क साधाल.
वृश्चिक
दिनांक १८, १९ या दोन दिवसांत पाऊल जपून टाका. कारण असे दिवस म्हणजे नेहमी टांगती तलवारच असते हे लक्षात ठेवा. इतरांनी काय करावे काय करू नये याचा सल्ला देत बसू नका. आपले काम भले नि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवल्यास त्रास होणार नाही. न जमणाऱ्या गोष्टींची जबाबदारी घेणे म्हणजे स्वत:हून त्रास ओढावून घेतल्यासारखे आहे. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात मोठी गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाला कामात येणारे अडथळे दूर करावे लागतील.आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होईल.राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टींत ढवळाढवळ करू नका. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.
धनू
षष्ठ स्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. असे वातावरण असले की तुम्हाला काही सुचत नाही. शांत बसायचे असे तुम्ही ठरवता आणि परिस्थिती अशी निर्माण होते की तुम्ही स्वत:च कांगावा करता, त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की असे करण्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. त्यापेक्षा शांतपणे तुमचे मत मांडा म्हणजे त्रास होणार नाही. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. बाकी दिवसांचा कालावधी ठीक राहील. व्यवसायात धावपळ होईल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढेल. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार टाळा.
मकर
दिनांक १८, १९ व २३ असे हे तीन दिवस ‘धरले तर चावते सोडले तर पळते’ अशी स्थिती निर्माण होईल. काय निर्णय घ्यावा काय घेऊ नये हे तुम्हाला सुचणार नाही आणि समोरच्याने आपलेच ऐकावे ही मानसिकता राहते. समोरच्याने ऐकले नाही म्हणूनही त्रास करून घेता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. ज्या वेळी असे दिवस असतात, त्या वेळी आपणच शांत घेणे केव्हाही चांगले. बोलताना शब्द जपूनच वापरा म्हणजे समोरच्याला वाईट वाटणार नाही. इतरांनी बदल करावा ही अपेक्षा ठेवू नका. स्वत:तच बदल करायला शिका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात गुंतवणूक सध्या तरी करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे.
कुंभ
दिनांक २०, २१, २२ हे तीन दिवस सतर्क राहून काम करा म्हणजे नुकसान होणार नाही. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. एखादी गोष्ट वेळेत झाली नाही म्हणून चिडचिड करू नका. कारण सध्या असेच दिवस आहेत. चांगले काम होण्यासाठी वेळ लागणार आहे, तेव्हा नियोजन करून काम करा. त्रास करून घेण्यापेक्षा एखादे काम कमी करा म्हणजे त्रास होणार नाही. धरसोड वृत्ती टाळा. एका मतावर ठाम राहा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातील परिस्थिती बदलेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार जपून करा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. मित्र परिवाराची मदत मिळेल. कोणतेही काम करताना जोडीदाराला विश्वासात घ्याल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन
दिनांक २३ रोजी कोणतेही महत्त्वाचे करार करू नका. महत्त्वाचे करार चांगल्या दिवसांत करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाच्या कामाला सुरुवात करा. ते काम पूर्ण होईल. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टी करण्याचा संकल्प करता आणि त्या पूर्णत्वाला जात नाहीत. सध्या हा संकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. कामे मार्गी लागतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार चांगले होतील. नोकरदार वर्गाला कामाचा अंदाज येईल. आर्थिकदृष्ट्या नियोजन मार्गी लागेल. राजकीय क्षेत्रातील हालचाली बदलतील. मित्र-मैत्रिणींशी जेवढ्यास तेवढे राहा. संततीचे लाड करा, शिस्त बिघडू देऊ नका. घरात कार्यक्रमाची रूपरेषा आखाल. प्रकृती चांगली राहील.