माणसाला रोजच्या तणावापासून दूर जाता यावं, विरंगुळा मिळावा यासाठी मनोरंजन खूप महत्त्वाचे असते. मनोरंजन म्हटलं की चित्रपट आलेच. काल्पनिक, खऱ्या घटनांवर आधारित, रोमँटिक, खळखळून हसवणारे, रडवणारे, सस्पेन्स असणारे, हेरगिरीवर आधारित, देशभक्तिपर, गुन्हेगारीवर आधारित अशा अनेक प्रकारचे अनेक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
द मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने २० सप्टेंबर हा राष्ट्रीय सिनेमा दिवस म्हणून घोषित केला आहे. या दिनानिमित्त चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफरदेखील आहे. फक्त ९९ रुपयांत प्रेक्षकांना चित्रपट पाहता येणार आहे. संपूर्ण देशभरात चार हजारांपेक्षा जास्त स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत.