कार खरेदी करायचीय?जाणून घ्या या दमदार कारबद्दल, 5 स्टारचे रेटिंगही…

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

तुम्हाला फॉर्च्युनर आवडते का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. टोयोटा फॉर्च्युनर ही भारतातील सर्वात लोकप्रिय फुल साइज एसयूव्ही आहे. मात्र, आता त्याच्या तुलनेत एक अतिशय दमदार कार येत आहे. फोक्सवॅगन ते आणत आहे. त्याचे नाव फॉक्सवॅगन टायरोन आहे. नुकतेच त्याला 5 स्टारचे सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.तुम्हाला कार खऱेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी खास कार घेऊन आलो आहोत. तुम्हाला फॉर्च्युनर आवडते का? असं असेल तर ही एसयूव्ही देखील फॉर्च्युनरला टक्कर देणार आहे, आता ही नेमकी गाडी कोणती आहे, याविषयी पुढे जाणून घेऊया.

एक मोठी एसयूव्ही लाँच
फोक्सवॅगन भारतात एक मोठी एसयूव्ही लाँच करणार आहे. फोक्सवॅगन टायरोन असेल. नुकतीच युरो एनसीएपीने याची क्रॅश टेस्ट केली आहे, ज्यामध्ये फोक्सवॅगन टायरॉनला 5 स्टारचे सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. फोक्सवॅगन टायरॉन ही 7 सीटर एसयूव्ही आहे. फोक्सवॅगन टायरोन व्हीडब्ल्यू ही टिगुआन आर-लाइनची 7 सीटर एडिशन आहे.

हे मॉडेल काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाले होते. आता मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, फुल साइज एसयूव्ही 2025 च्या आसपास भारतात लाँच केली जाऊ शकते. भारतात लाँच झाल्यानंतर त्याची थेट टक्कर टोयोटा फॉर्च्युनरशी होणार आहे.

टायरॉनचे डिझाइन काय असेल?
फोक्सवॅगन टायरॉनचे बाह्य डिझाइन देशात विकल्या जाणाऱ्या 5 सीटर टिगुआन आर-लाइनसारखेच आहे. जसे या ड्युअल-पॉड प्रोजेक्टरमध्ये एलईसी हेडलाइट्स आहेत, जे स्लीक लाइट बारला जोडलेले आहेत. लाइट बारच्या खाली आर-लाइन व्हेरियंटमध्ये आर बॅजसह ब्लॅक ट्रिम आहे. फ्रंट बंपरमध्ये हिऱ्याच्या आकाराची एअर इन्टेक चॅनेलसह मोठी ग्रिल देण्यात आली आहे.

फिचर्स अतिशय नेत्रदीपक असतील
प्रोफाईलच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मॉडेलमध्ये 20 इंचापर्यंत अलॉय व्हील्स मिळतात, तर टिगुआन आर-लाइनप्रमाणेच भारतीय मॉडेलमध्ये 19 इंचाचे ड्युअल टोन रिम्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्या लांब व्हीलबेसमुळे टायरॉन टिगुआनपेक्षा मोठी दिसते. याशिवाय 7 सीटर एसयूव्हीमध्ये सिल्व्हर रूफ रेल आणि बॉडी कलरचे डोअर हँडल आणि आउटसाइड रिअरव्ह्यू मिरर (ORVM) देण्यात आले आहेत.

10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
मागील बाजूस टायरॉनमध्ये पिक्सल-डिझाइन घटकांसह जोडलेले एलईडी लाईट आणि बंपरवर एक काळा भाग देण्यात आला आहे जो एकाच वेळी स्लीक परंतु मजबूत लुक देतो. डॅशबोर्डची मांडणीही 5 सीटर टिगुआन सारखीच आहे. आर-लाइन मॉडेलमध्ये एकच ऑल-ब्लॅक थीम, 3-स्पोक स्टीअरिंग व्हील, 15-इंच फ्लोटिंग इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे. यात डॅशबोर्डवर काही एम्बियंट लाइटिंग देखील आहे जे त्याला उत्तम लुक देते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *