भारतीयांना आता थायलंड मध्ये visa-free entry ची मर्यादा अमर्याद काळासाठी वाढ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारतीयांना आता थायलंड (Thailand) मध्ये visa-free entry ची मर्यादा आता अमर्याद काळासाठी वाढवली आहे. पूर्वी केलेल्या घोषणेनुसार, थायलंड मध्ये भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री 11 नोव्हेंबर पर्यंतच मिळणार होती पण आता मुदतवाढ देण्यात आली आहे. भारतीय थायलंड मध्ये 60 दिवस व्हिसा फ्री राहू शकतात. त्यामध्येही local immigration office कडून 30 दिवसांचे एक्सटेंशन मिळू शकते. त्यामुळे आता थायलंडचे सौंदर्य आणि सांस्कृतिक ठेवा पाहण्यासाठी भारतीयांची व्हिसाच्या कटकटीमधून सुटका झाली आहे.

थायलंड हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतीयांना हा आशियाई देश जवळ असल्याने येथे पर्यटन वाढवण्यास, रोजगाराच्या संधी वाढवण्यास मदत होणार आहे.

पूर्वी, थायलंडचा व्हिसा मिळविण्याच्या प्रक्रियेत शुल्क आणि कागदपत्रे आणि काही प्रकरणांमध्ये प्रतिक्षा कालावधी समाविष्ट होता. आता डॉक्युमेंटेशन काढून टाकल्यामुळे जानेवारी ते ऑक्टोबर 2024 च्या मध्यापर्यंत भारतीय पर्यटकांची संख्या सुमारे 16.17 मिलियन इतकी वाढली. व्हिसा-मुक्त प्रवासामुळे विकेंडला देखील भारतीय आयत्या वेळी बुकिंग करून आपली ट्रीप प्लॅन करू शकतात.

भारतीयांसाठी सुरूवातीला व्हिसा-मुक्त प्रवेश थायलंड सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये सादर केले होते आणि ते एका वर्षासाठी लागू करण्यात आले होते. त्यानुसार 11 नोव्हेंबर 2024 पर्यंतच त्याची मुदत होती.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *