ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नीचे निधन

Spread the love

लेखणी बुलंद टीम;

हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक (Helena Luke) यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही दिवासापासून त्या आजारी होत्या. अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहत होत्या. हेलेना ल्युक यांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. रविवार, 3 नोव्हेंबर 2024 रोजी तिनं अखेरचा श्वास घेतल्याचं यात म्हटलं आहे.

अभिनेत्री सारिकाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती मॉडेल-अभिनेत्री हेलेना ल्यूकला भेटले. असं म्हटलं जातं की दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकापोठोपाठ यश मिळत असल्यामुळं त्यावेळी मिथुन करिअरच्या शिखरावर होते. मात्र, 1979 मध्ये झालेला हा विवाह फार काळ टिकला नाही. एक वर्षात त्यांचा संसार फिस्कटला. केवळ 4 महिन्यात दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मिथुननं पुन्हा हेलेनाची कधीच विचारपूस करण्याचा प्रयत्न केला नाही.

हेलेना यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द गाजवण्याचा प्रयत्न केला. ‘आओ प्यार करें’, ‘दो गुलाब’ आणि ‘साथ साथ’ या चित्रपटांमध्ये ती दिसल्या. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘मर्द’ या चित्रपटातही काम केलं होतं. यामध्ये तिने ब्रिटीश राणीची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. परंतु, नंतर तिनं चित्रपट विश्व सोडलं आणि ती न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाल्या. या ठिकाणी त्या डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होत्या.

मिथुन यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर हेलेना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचा चार महिन्यांचा संसार अंधुक स्वप्न बनला आहे. मिथुननं माझं ब्रेनवॉश केलं होतं आणि मला विश्वास दिला होता की आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. पण हे फार काळ टिकू शकले नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *