7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. या काळात भेटवस्तू देण्यापासून ते डेटवर जाण्यापर्यंत सौंदर्य आणि पोशाखाची विशेष काळजी घेतली जाते. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे ला डेटवर जाणार असाल तर तुम्हाला सुंदर दिसणे गरजेचे वाटत असेल तर त्यासाठी त्वचा निरोगी राहणे खूप आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेण्यासोबतच काही गोष्टी चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्यावर गुलाबी चमक येऊ शकते. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्हाला ग्लोइंग, उजळ आणि पिंपळमुक्त त्वचा हवी असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता ते जाणून घ्या. चेहरा चमकदार आणि डागमुक्त दिसण्यासाठी दररोज त्वचेची काळजी घेण्याचे नियम पाळले पाहिजे. दररोज सकाळी एसपीएस 30 किंवा 50 सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
बीटमुळे येईल चेहऱ्यावर गुलाबी चमक बिट हे रोग्यासाठी वरदान मानले जाते. ते तुमच्या त्वचेला गुलाबी चमक देण्यासाठी मदत करते. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही बीटची पेस्ट तयार करू शकता किंवा त्याची पावडर वापरू शकता. त्यात दूध आणि थोडा मध मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा.
या फेस पॅक मुळे त्वचा होईल नितळ आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे ज्याचे आरोग्यासाठी आश्चर्यकारक फायदे आहेत. जेव्हा तुम्हाला घसा दुखिचा त्रास होत असेल तेव्हा तुम्ही अनेकदा ज्येष्ठमध खातात. परंतु तुमच्या त्वचेवर देखील त्याचे आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतात. ज्येष्ठमधामुळे त्वचा एक वेळेला उजळ होत नाही परंतु यामुळे त्वचा स्वच्छ होते. ज्येष्ठमधाच्या पावडर मध्ये दही मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यापासून माळेपर्यंत लावा. हा फेस पॅक तुम्ही रोजही लावू शकता.
पहिल्यांदा लावल्यावर दिसेल या फेसपॅकचा प्रभाव बटाटा घरामध्ये सहज उपलब्ध होतो त्याचा रस ब्लिचिंग एजंट ने समृद्ध असतो त्यामुळे रंग उजळ होण्यास मदत मिळते. बटाट्याच्या रसात थोडे तांदळाचे पीठ मिक्स करून त्यात लिंबाचा रस, टोमॅटोचा रस, कोरफड जेल घालून चेहऱ्यावर लावा. जेव्हा फेस पॅक मध्ये थोडासा ओलावा शिल्लक असेल तेव्हा चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा आणि काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
कच्च्या दुधाच्या वापरामुळे होईल चेहऱ्यावरील टॅनिंग दूर जर तुम्हाला टॅनिंग झाला असेल तर तुमचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. ते दूर करण्यासाठी कच्चे दूध खूप प्रभावी आहे. कच्चा दुधात चिमूटभर हळद आणि एक चमचा मध मिसळून रोज चेहऱ्याला लावा. यामुळे निस्तेजपणा दूर होईल आणि त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.