ख्यातनाम गायिका वैशालीताई शिंदे यांना अखेरचा जय भिम…….
महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका, आंबेडकरी चळवळीचा आवाज वैशालीताई शिंदे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.वैशाली शिंदे यांचा जन्म ४ एप्रिल १९९२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अति दुर्गम गावात मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबात झाला. प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्या सोबत विवाह झाल्यानंतर त्या दया क्षीरसागरच्या वैशाली शिंदे झाल्या. आंबेडकर चळवळीतील भिम – बुद्ध गिते गाऊन त्यांनि आपले आयुष्य प्रबोधन करण्यात घालवले. देशवासियों जागते रहो,गांधीचा जीवनदाता,बोलो जय भिम बोलो व त्यांनी गायलेली अशी अनेक गाणी अजरामर झाली. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी समाजात शोककळा पसरली आहे.