उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा, खोचक शब्दांमध्ये टीका

Spread the love

उद्धव ठाकरे यांनी आज रायगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यांनी शिर्डीत आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पण महाराष्ट्रात सध्या ज्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे त्या मराठा आरक्षणावर मोदी काहीच बोलले नाहीत. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

रायगड | 27 ऑक्टोबर 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे आज रायगड जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीच्या निमित्ताने आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी काल शिर्डीच्या दौऱ्यावर आले होते. मोदींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्ये केलं. पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आरक्षणासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलायचं नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“व्यासपीठावर मी शिवसेनेकडून आहे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून आहेत. जयंत पाटील शेकाप पक्षाकडून आहेत. शिवसेना आणि शेकाप पक्षाच्या एकेकाळी अगदी मारामाऱ्या झाल्या आहेत. चॅलेंज दिले आहेत. येऊन दाखवा, असे चॅलेंज दिले आहेत. हे सगळं झालं आहे. एवढी वर्ष गेल्यानंतरसुद्धा आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो आणि आलो याचं कारण असं की, त्या सर्व मारामाऱ्या आणि विरोध व्यक्तीगत नव्हता”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

‘विरोधक असतील तर संपवू, पण सोबत असतील त्याला सुद्धा संपव’

“सूडाचं राजकारण कुणीच केलं नाही. म्हणजे शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. तशी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री उघड होती. उघड पाठिंबा दिला होता. पण जिथे मतं पटायची नाहीत तिथे मताला विरोध केला जायचा. आताचं जे सुरु आहे, विरोधक असतील तर संपवू, पण सोबत असतील त्याला सुद्धा संपव. हे समीकरण मी करणाचं चालू आहे. माझ्याशिवाय कुणीच नको”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *