निवडणूक प्रचार दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात जनतेला दिली 5 आश्वासने

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केले असून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

कोल्हापुरात शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचार दरम्यान जनतेला 5 आश्वासने दिली.
ते म्हणाले, राजुयातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची व्यवस्था राज्यसरकार करणार आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करणे, शेतकऱ्यांना एमएसपी देणे, पोलिसांची भरती करणे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करण्याचे आश्वासन त्यांनी दिली.
राज्यातील विद्यार्थिनींना राज्यसरकार कडून मोफान शिक्षण दिले जातात.मात्र महाविकास आघाडीची सरकार आल्यानन्तर राज्यातील मुलाला आणि मुलींना मोफत शिक्षण दिले जातील. सरकारी शाळेत दोघांना मोफत शिक्षण दिले जाणार.

पोलिसांची भरती करणे
बऱ्याचदा महिलांना पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार कुठे करावी हे समजत नाही.
एमव्हीएचची सत्ता आल्यावर महिला पोलिसांची भरती केली जाईल. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ पदावर महिला अधिकाऱ्यांसह सुसज्ज पोलीस ठाणे स्थापन केले जाणार.

मुंबईतील अडाणी प्रकल्प रद्द करून धारावीवासीयांना उद्योगासह घरे दिले जातील.
आगामी काळात सत्तेत आल्यास महाराष्ट्राच्या मातीच्या सुपुत्रांना धारावी आणि मुंबई परिसरात परवडणारी घरे देऊ, असे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना एमएसपी दिला जाईल आमचे सरकार असते तर शेतकरी कर्जमुक्त झाला असता.आमची सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना एमएसपी कृषी उत्पादनासाठी देऊ.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेऊ. आमची सरकार आल्यावर पुढील पाच वर्षे महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तू, डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव स्थिर करू.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *