मुंबईच्या गोराई परिसरातील वैराल तलावाजवळील हिल व्ह्यू हॉटेलजवळ आज सकाळी एक भीषण दुचाकी अपघात झाला. या अपघातातदोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे तिघेही तरुण मुंबईच्या सायन-कोळीवाडा परिसरातील रहिवासी असून, सहलीसाठी गोराई परिसरात आले होते.
यावेळी दुचाकीवर तिघेही स्वार असल्याने वाहनावर नियंत्रण राखता आले नाही. तलावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी घसरली आणि अपघात झाला.अपघात इतका जोरदार होता की, यात दोन तरुणांनी जागीच प्राण गमावले, तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या तिघांनी मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली असून, अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.