राज्यातील अपघातांची मालिका कमी होताना दिसत नाही. आज पु्न्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर वाहने पलटी होऊन भीषण अपघात झाला.या अपघाताचा थरार cctv कॅमेऱ्यात कैद झाला असून बोलेरो कारने दोनदा पलटी घेतल्याचं व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील सोलापूर टेक्टाईल दुकानाबाहेर ही अपघाताची घटना घडला, त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलेभरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडकली. त्यामध्ये, दोन महिला जखमी झाल्या आहेत.
सोलापूर टेक्सटाईल येथून बाहेर जाणाऱ्या स्कुटीवरील दोन महिला या अपघातात जखमी झाल्या आहेत.रोहिणी सुरेश पुप्पल, उषा नारायण वाघे असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. जखमी झालेल्या दोन्हीही महिलांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात बुलेरो आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून रस्त्याच्या बाजुला लावण्यात आलेल्या लोखंडी डिव्हायडरचेही नुकसान झालं आहे.