महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार साखर कारखान्यात काम सुरू असताना सल्फर टाकीचा स्फोट झाला. अशोक तेजराव देशमुख 56 आणि आप्पासाहेब शंकर पारखे 42 अशी मृतांची नावे आहे. एक व्यक्ती जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल आहे. याप्रकरणी परतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केल्याचे सांगितले. साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट कसा झाला? या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच अपघाताचे कारण समजेल.