गोव्यात पॅराग्लायडिंग करताना निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यु 

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पॅराग्लायडिंग हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, पॅराग्लायडिंग करताना अनेक वेळा अपघात झाले आहेत, ते टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गोव्यात पॅराग्लायडिंग करताना निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पॅराग्लायडिंग करणाऱ्या पर्यटक महिलेचा आणि तिच्या प्रशिक्षकाचा दुर्दैवी मृत्यु झाला. सदर माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

हा अपघात शनिवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास केरी गावात केरी पठारावर घडला. या अपघातात पुण्यातील रहिवासी पर्यटक शिवानी दाबाळे आणि तिचे प्रशिक्षक सुमल नेपाली यांचा मृत्यु झाला. महिला ट्रेनर नेपाली होती. कंपनीच्या पायलटला परवान्याशिवाय पॅराग्लायडिंग करण्यास परवानगी दिली, ज्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला.

दाबाळे यांनी ज्या ‘ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कंपनी’कडे ‘पॅराग्लायडिंग’साठी बुकिंग केले होते.ती बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, फिर्यादीनुसार, ‘पॅराग्लायडर’ उड्डाण घेतल्यानंतर लगेचच दरीत कोसळले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीचे मालकाच्या विरुद्ध मांद्रेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाच्या विरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *