मेष – आज तुमच्या स्वभावात आणि वागण्यात बदल होतील. त्यामुळे जवळच्या लोकांना आश्चर्य वाटेल. तुमचे वैयक्तिक हित बाजूला ठेवून इतरांना मदत कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कार्यक्षेत्रात तुमचे लोकांशी संपर्क वाढतील. इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत मागे राहाल. खर्च वाढल्यामुळे आर्थिक लाभ कमी होईल.
वृषभ – आज तुम्हाच्या शारीरिक वेदना कायम राहातील. आरोग्याबाबत निष्काळजी होऊ नका. कोणत्याही प्रकारची शारीरिक आणि आर्थिक जोखीम घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य असेल. पैशांची आवक राहिल. एखाद्याला दिलेले वचन न पाळल्यामुळे मनावरील ओझे वाढेल. राजकीय लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका.
मिथुन – आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वादामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य काही तरी तुमच्याकडे मागेल. तुमची कार्यशैली मंदावेल. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर ठाम राहा. सार्वजनिक क्षेत्रात तुमची प्रतिमा प्रामाणिक राहिल. कामाच्या ठिकाणी कमी वेळेत अधिक काम करण्याचा फायदा होईल. पैसे किंवा पाठिंबा न मिळाल्याने काम रखडेल. जुन्या काही कामांमुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. बौद्धिक कार्यात गुंतलेल्या लोकांना कामात यश मिळू शकते.
कर्क – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. व्यवसायात नवीन रणनीती बनवाल. कोणच्या तरी विरोधाचा सामना करावा लागेल. तुम्ही तरुणांची बाजून पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा विचार कराल. कामाच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू चोरीला जाईल, त्यामुळे नुकसान होईल. कुणावरही विश्वास ठेवू नका. पोटाचे आरोग्य बिघडेल.
सिंह – आजचा दिवस तुम्हाला फलदायी ठरेल. योजनांवर प्रतिकूल परिणाम मिळतील. बौद्धिक कामातील लोकांना आज नव्या संधी मिळतील. अतिआत्मविश्वास टाळा अन्यथा अपमान होऊ शकतो. काम केल्याने पैसे मिळतील. सरकारी क्षेत्रात असणाऱ्यांना फायदा होईल. चुकीच्या वागणुकीमुळे प्रतिष्ठा गमवाल.
कन्या – आजचा दिवस तुमचा गुंतागुंतीचा असेल. मनात निराशाजनक विचार येतील. आर्थिक किंवा इतर कोणत्याही बाबतीत दिलेले वचन पूर्ण न झाल्याने मनात खेद राहिल. कार्यक्षेत्रात संघर्ष होईल. पैसे मिळवण्यासाठी नवीन युक्त्या अवलंबवाल. इतर आकर्षणांपासून दूर राहा. कर्जाचे व्यवहार टाळा. कौटुंबिक वातावरणतही गैरसमज निर्माण होतील. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा अडचणीत येऊ शकता.
तुळ – आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जुने काही काम बिघडल्याने तुम्ही निराश व्हाल. परंतु नवीन डील मिळाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल. नम्र राहिल्याने अनेक गोष्टी मार्गी लागतील. नातेवाईकांमुळे कुटुंबात वाद होतील. आपापसात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक – आज तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. व्यावसायिकांना आज नफा मिळविण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात कामाच्या ठिकाणी गुंतवणूक दुप्पट होऊ शकते. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. आज शांत राहाण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती लवकरच तुमच्या बाजूने असेल. आरोग्याच्या तक्रारी सतावतील.
धनु – आजचा दिवस संमिश्र असेल. दिवसाच्या सुरुवातीला नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फायदेशीर सौदे होतील. रखडलेले आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. तातडीने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. घरगुती सुखसोयी ठीक राहतील पण वाढणार नाहीत. घरात शांतता राहिल. तब्येतीत काही प्रमाणात सुधारणा होईल.
मकर – आज तुम्हाला घर आणि कामाच्या ठिकाणी परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो. दिवसाच्या सुरुवातीला आरोग्यामध्ये कमजोरी भासेल. दैनंदिन कामांमध्ये विलंब होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी शब्द जपून वापरा अन्यथा, कामात अडथळे येतील. पैशाच्या ओघ खर्चाच्या तुलनेत कमी असेल. व्यवसायातून मिळणारा पैसा इतर कामांवर खर्च होईल. कुटुंबात वाद होतील. आजर त्रास देतील
कुंभ – आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. समाजातील मोठ्यांकडून काही नवीन शिकायला मिळेल. सर्वांशी ताळमेळ राखता येणार नाही. अध्यात्मात आणि शिक्षणात अडचणी येतील. मोठ्या योजनेच्या तुलनेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. मोठ्यांचा सल्ला घ्या. कामांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
मीन – आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी असेल. अतिविचार केल्यामुळे लाभदायक संधी हुकतील. कामाच्या ठिकाणी नवीन योजनेवर काम करण्याची संधी मिळेल. भविष्यात प्रगती होईल. इतरांवर राग करणे टाळा. शांततेने परिस्थिती हाताळा. नोकरदारांना महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने आनंद होईल. घरगुती वातावरणात शांतात अनुभवाल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)