आजचे राशिभविष्य, १८ ऑगस्ट २०२४ : आज नवीन काम सुरु करण्यासाठी दिवस शुभ राहिल..काय सांगते तुमची आजची रास?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मेष –आज वडिलांच्या आशीर्वादाने सुरु केलेल्या कार्यात यश मिळेल. भावा- बहिणींसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. त्यांच्याकडून चांगली बातमी मिळेल. गुंतवणूक केली असेल तर त्यातून फायदा होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधाल. नवीन व्यवसायातून लाभ होईल. जोडीदाराशी काही मुद्द्यावरुन वाद होतील. व्यवसायासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील. संध्याकाळी धार्मिक कार्यात वेळ घालवाल.

 

वृषभ – आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर नफा मिळेल. आरोग्य थोडे कमकुवत राहिल. प्रेम जीवनात नवीनता आणि गोडवा येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येऊ शकतात. कुटुंबातील तणाव आज संपेल. वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल.

 

मिथुन –आज धार्मिक कार्यात मन लागेल. व्यवसाय सुरु असलेला करार आज फायनल होईल. तुम्ही स्वत:साठी शॉपिंग कराल. मुलांचे चांगले काम पाहून मन आनंदी राहिल. भावासोबत मतभेद होऊ शकतात. सासरच्यांशी संबंध दृढ होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

 

कर्क – आज सकाळपासून लाभाच्या नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. ज्यामुळे भविष्याबाबतची चिंता कमी होईल. वैवाहिक प्रस्ताव येतील. जोडीदाराच्या तब्येतीत काही समस्या येतील. सावध राहाण्याची गरज आहे. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल.’

 

सिंह –आज नवीन काम सुरु करण्यासाठी दिवस शुभ राहिल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे वर्तन असहकार असेल. सर्जनशील कार्य पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागेल. शत्रू तुम्हाला त्रास देतील. जुना सहकारी मदत मागेल. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू खरेदी कराल.

 

कन्या –आज तुमचे व्यक्तीमत्त्व उच्च राहिल. तुमच्या संपत्ती वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या सासरच्या व्यक्तीनी उधार घेतलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांना भविष्यातील रणनीतींवर काम करण्याची संधी मिळेल. मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील. भावाच्या मदतीसाठी पुढे याल. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल.

 

तुळ – आज ऑफिसमध्ये अधिकारी तुमच ऐकतील. सूचनांची अंमलबजावणी कराल. नोकरी आणि घरातील कामे सहज पूर्ण होतील. बंद सुरु असलेला व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ चांगला घालवाल. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

 

वृश्चिक –आज नोकरीशी संबंधित लोकांना अधिकाऱ्यांकडून आशीर्वाद मिळेल. निष्काळजीपणामुळे कौटुंबिक वातावरण विस्कळीत होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित कोणतीही कायदेशीर बाब तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. मुलाच्या प्रगतीमुळे मनामध्ये आनंदी राहिल. तुमचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखावे लागेल.

 

धनु –आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील सुख-शांतीसाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील. धर्म आणि कामावर एकनिष्ठ राहाल. प्रेम जीवनात गोडवा राहिल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. व्यापारी वर्गासाठी काळ आनंददायी राहिल.

 

मकर –आज कामात विलंब होऊ शकतो. नोकरीच्य ठिकाणी काम विचारांच्या विरुद्ध असेल. सहकारी किंवा कर्मचारी अज्ञानाचा फायदा घेतील. बुद्धीच्या मदतीने सर्व आव्हानांवर मात कराल. ऑफिसमध्ये जास्त काम दिले जाऊ शकते. कठोर परिश्रम केल्याने काम वेळेवर पूर्ण कराल.

 

कुंभ –राजकारणाशी संबंधित लोकांना प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढवण्याची संधी मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. कुटुंबात आनंद साजरा केला जाईल. अडकलेले पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न कराल.

 

मीन –आज भावंडांसोबत वेळ घालवाल. त्यांच्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात कोणतीही रिस्क घेऊ नका. मालमत्ता खरेदी कराल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *