मेष – आज तुमच्या अहंकारामुळे सगळं गमवाल त्यामुळे तुमचा अपमान होऊ शकतो. काम करण्याची मानसिकता आज नसेल. भुतकाळातील चुकीच्या वागणुकीमुळे किंवा निष्काळाजीपणामुळे तुमची कोणीही साथ देणार नाही. नोकरी व्यवसायातून पैसे मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. अधिक कमाई करण्यासाठी सरकारी नियमांचे उल्लंघन कराल
वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. आज काम अनिच्छेने करावे लागेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील. मनोरंजनाच्या संधी सोडणार नाही. कुटुंबात मतभेद होकील. कार्यक्षेत्रात जुन्या गोष्टींमुळे मनात भीती राहिल. तुमच्या चुकीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. पैशांचा जुगाड कराल. वैयक्तिक सुखसोयींवर पैसे खर्च कराल
मिथुन – आज तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक कुशाग्र असेल. सामाजिक क्षेत्रातील वाद मिटवण्यासाठी तुमचे सहकार्य घेतले जाईल. कामाच्या ठिकाणी अनुभवाच्या मदतीने संधी निर्माण कराल. अतिआत्मविश्वासाची भावना काम बिघडवेल. दूरच्या व्यवसायातून पैसे मिळतील. घरगुती खर्च वाढल्यामुळे बचत कराल. कार्यक्षेत्रात काम संथपणे असल्यामुळे चिडचिड होईल.
कर्क – आज तुम्हाला विनाकारण कलह आणि त्रासाला सामोरे जावे लागेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या कामामुळे असमाधानी असतील. काही कारणामुळे मन विचलित होईल. खर्चात वाढ आणि मर्यादित उत्पन्नामुळे भविष्याची काळाजी वाटेल. आर्थिक लाभाची आशा दुरावेल. अचानक धनप्राप्ती मनाला शांती देईल.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. सुख-सुविधांमध्ये घट होईल. भावंडांच्या वागणुकीमुळे तुम्ही चिंतेत पडाल. आज कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आज घरात वडिलोपार्जित संपत्तीबद्दल चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी मन उदार लाहिल. खर्चासोबत पैशांची आवक वाढेल.
कन्या – आज तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना निर्माण होईल. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. व्यवसायाची कामे वेळेवर पूर्ण होतील. पैशांची आवक होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. आर्थिक लाभ होतील. जोडीदारावर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. मुलांवर लक्ष ठेवा. नोकरदारांच्या उत्पन्नात वाढ होईल.
तुळ – आज तुमच्या स्वभावात आणि वागणुकीत बराच फरक जाणवेल. मनात द्वेषाची भावना निर्माण होईल. तुमचे बोलणे आणि वागणे अडचणीत आणू शकते. बोलताना मोठ्यांचा आदर करा. तुमच्या इच्छेचे पालन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न कराल. तुमचा आदर कमी होऊ शकतो.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले फल देईल. कोणत्याही कामात स्वत:वर जबरदस्ती करु नका. अपशयामुळे चुकीच्या गोष्टी कराल. कोर्टाच्या गोष्टी अडकाल. आर्थिक बाबीत तुम्ही अधिक स्पष्ट राहा. पैशांची फसवणूक होईल. सुसंवाद साधा अन्यथा नात्यात दूरावा येईल.
धनु – आज आपल्या सामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरील लोकांशी कमी संपर्क ठेवा. तुमची बदनामी होऊ शकते. काही गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रात लहान मुलांची मदत घ्यावी लागेल. अडचणींना सामोरे जावे लागेल.
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक गुंतागुंतीचा असेल. कौटुंबिक सदस्यांशी भांडण होण्याची भीती असेल. घरातील व्यक्तीशी मालमत्ता किंवा व्यवसायाबाबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मनाने काम कराल. अधिकारी तुमच्यावर नाराज होतील.
कुंभ – आज मन धार्मिक कार्याने भरलेले राहिल. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेमुळे आपल्याला यासाठी योग्य वेळ मिळत नाही. काम आणि व्यवसायात देखील चांगले काम कराल. पैशाशी संबंधित बाबी पूर्ण होतील. दैनंदिन खर्चात वाढ होईल.
मीन – आज तुम्ही आजाराने त्रस्त असाल. डोकेदुखीमुळे जडपणा जाणवेल. सर्दी-खोकल्याच्या तक्रारी सुरु राहातील. काम करण्याचा उत्साह कमी राहिल. तब्येतीमुळे आळसपणा वाढेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनिच्छेने काम करावे लागेल.कामाच्या ठिकाणी आर्थिक बाबींवर कोणाशी वाद होऊ शकतो. खोटी आश्वासने देऊन कर्ज बुडवणे टाळण्याचा प्रयत्न करा
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)