मेष – आज व्यावसायिक लोकांसाठी चांगला करार निश्चित होईल. व्यवसाय अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न कराल. तुमचा आज विशेष सन्मान होईल. भौतिक प्रगतीची शक्यता चांगली दिसते आहे. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्यामुळे सामाजिक वर्तुळ वाढेल. तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील.
वृषभ – आज कामातील वातावरण अनुकूल असेल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. व्यावसायिक लोक नवीन योजनेवर लक्ष केंद्रित करतील. तुम्हाला आज मानसिक शांती मिळेल. कायदेशीर वादातून सुटण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या शौर्यात वाढ होईल. शिक्षणातील अडथळे दूर होतील.
मिथुन – आज तुमच्या व्यवसायातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यात वेळ घालवाल. त्यामुळे इतर कामे रखडतील. नोकरीशी संबंधित लोक त्यांच्या आवडीचे काम करतील. तुमच्या कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी विशेष जबाबदारी मिळेल. कठोर परिश्रमाने काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
कर्क – आज ऑफिसमधलं वातावरण तुमच्या बाजूने असेल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. शत्रू तुमचे नुकसान करु शकणार नाही. कोणतेही काम कराल त्यात यश निश्चित मिळेल. व्यवसायातील विखुरलेली कामे पूर्ण करण्यासाठी रणनीती बनवाल. आळस दूर करुन कामाकडे लक्ष द्या. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसोबत फिरायला जाल.
सिंह – आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यातील योजना पूर्ण करण्यात व्यस्त असाल. त्यामुळे तुमची धावपळ अधिक होईल. कामामुळे थकवा जाणवेल. वैवाहिक जीवनासाठी वेळ काढू शकाल. नोकरीत वरिष्ठांमुळे कामात अडथळे येतील. पालकांशी खास मुद्द्यांवर चर्चा कराल
कन्या – आज तुमच्या कुटुंबात शुभ कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते. वडिलांच्या सल्ल्याती आवश्यकता भासेल. सासरच्या लोकांशी संबंध सुधारतील. मित्राला उधार दिलेले पैसे विचारपूर्वक घ्या. वागण्यात संयम आणि सावधगिरी बाळगावी लागेल. जवळच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात. नोकरीशी संबंधित लोकांना आज काही नवीन काम मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल
तुळ – कामाच्या ठिकाणी आज वाद होतील. नवीन प्रकल्पावर काम सुरु होऊ शकते. मालमत्तेच्या संबंधित कोणते प्रकरण सुरु असेल तर त्यात निराशेचा सामना करावा लागेल. मुले सामाजिक कार्यात सहभागी होतील. कुटुंबात बराच काळ तणाव सुरु राहिल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल
वृश्चिक – आज तुमच्यासाठी दिवस मजबूत असेल. आर्थिक परिस्थितीबाबत कमी चिंतेत असाल. रखडलेले पैसे आज मिळतील. कुटुंबाच्या सर्व मागण्या पूर्ण कराल. घरात सुख-शांती आणि स्थिरता अनुभवाल. नोकरी आणि व्यवसायात नाविन्यता आणाल. कामात नवीन संधी मिळतील.
धनु – आज व्यवसायात थोडीशी जोखीम स्वीकारावी लागेल. जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. व्यवसायाच्या नवीन संधी आजूबाजूला असतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी बोलण्यात नम्र राहावे लागेल.
मकर – आज पार्टनरशीपमध्ये केलाला व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. हाती घेतलेली कामे करताना मन विचलित होऊ शकते. घरगुती कामे मार्गी लावण्याची सुवर्ण संधी मिळेल. लग्नाशी संबंधित निर्णय घ्यावा लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ – आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला थकवा जाणवू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. लाभाच्या अनेक नवीन संधी मिळतील. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रत्येक कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल.
मीन – आज तुम्हाला व्यवसायात जोखीम घ्यावी लागेल. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होईल. कोणत्याही अडचणीत सापडेलल्या व्यक्तीला मदत कराल. आज तुमच्या बुद्धिमत्तेच्या वापर करुन तुम्ही सर्व साध्य करु शकता. गोड आणि सौम्य वागण्याने समस्या सोडवाल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)