लेखणी बुलंद टीम:
मेष – बोलण्यावर नियंत्रण ठेवा.आज तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी प्रवास करु शकता. ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल.
वृषभ – विचारपूर्वक निर्णय घ्याल.आज कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लान कराल. काळजीपूर्वक काम करावे लागेल. कोणताही करार फायनल झाल्यास विचार करा, अन्यथा भविष्यात नुकसान होईल. जवळच्या व्यक्तीच्या लग्नातील अडथळे दूर होतील
मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. व्यवसायात नवीन काही करण्याचा विचार कराल. ज्यामुळे फायदा होईल. मुलांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या संदर्भात मनात नवीन योजना आखाल. काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. बोलण्यापूर्वी काळजी घ्या.
कर्क – आज तुमची सगळी कामे पूर्ण होतील. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ घालवाल. मनाला शांती मिळेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. काही काम पूर्ण झाल्यावर मन प्रसन्न राहिल. सहकाऱ्यांसोबत तीव्रता वाढेल. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल.
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल. ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत कराल. भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. शिक्षणात काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. तुमचे प्रयत्न आणि आत्मविश्वासात वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी मित्रांची मदत मिळेल.
कन्या – पैसे वाचवण्यात यशआज कुटुंबासोबत कोणत्यातरी विषयावर वाद होऊ शकतो. नियोजित कामे बिघडू शकतात. कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. नवीन शत्रू विनाकारण उद्भवू शकतात. अर्थव्यवस्था मजबूत होईल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वाहनांचे सुख मिळेल.
तुळ – आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते सहज मिळेल. राजकीय स्पर्धेत तुमचा विजय होईल. काम वेळेवर पूर्ण कराल. शुभ समारंभात सहभागी व्हाल. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. नोकरदार लोकांचे अधिकार वाढतील. कोणत्याही वादात पडू नका.
वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सासरच्यांकडून पैसे मिळतील. व्यवसायात अधिक नफा मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल. ज्यामुळे यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट होईल. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू खरेदी कराल.
धनु – आज तुमच्या ज्ञानात वाढ होईल. कामातील अडथळे आज दूर होतील. भावा बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन व्यवसायासाठी योजना बनवाल. ज्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मकर – आज तुमच्या शौर्यात वाढ होईल. व्यवसायात सावध राहा, अन्यथा पैसे अडकू शकतात. रागवलेल्या जोडीदाराला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. मुलांच्या भविष्याची चिंता सतावेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील.
कुंभ – आज तुमचे जुने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आळस तुम्हाला झटकावा लागेल. तुमची बाजू इतरांसमोर मांडण्यात यशस्वी व्हाल. धार्मिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. मनात चांगल्या भावना जागृत होतील. कुटुंबात तणाव निर्माण होईल.
मीन – आज मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक लाभ होतील. आरोग्याशी संबंधित आजार त्रास देतील. खाण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यात रुची वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)