आजचे राशीभविष्य 16 August 2024 : आज विवाहाचे योग ठरतील..पहा काय सांगते तुमची रास?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

मेष – तुमच्या स्वतंत्र वृत्तीमुळे हट्टीपणा वाढेल. नेहमीच्या नियोजित कामांमध्ये फार मोठा फरक करून इतरांचे डोळे दिपवून टाकावे.

वृषभ-संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी चालून येतील. प्रकृतीकडे मात्र लक्ष दिले पाहिजे.

 

मिथुन-अपचन, पायदुखी यासारखे आजार संभवतात. शिस्त आणि टापटीत या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या.

 

कर्क-स्वतःबरोबर इतरांनाही कामाला लावाल. तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळण्यासाठी घरच्या लोकांचा हस्तक्षेप सहन करावा लागेल.

 

सिंह –आज एखादा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील.

 

कन्या-आवक वाढेल, परंतु खर्चही वाढल्यामुळे हातात पैसा राहणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील.

 

तूळ –नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन होईल.

 

वृश्चिक –घरातील व्यक्तींना खुश ठेवण्यासाठी एखादा वेगळा बेत आखाल.

 

धनु- विवाह करायचा आहे त्यांचे विवाह ठरतील. तुमची आनंदी वृत्ती स्वतःबरोबर इतरांनाही उत्साह देऊन जाईल.

 

मकर-महिलांना निग्रही आणि निश्चय बनवणारे ग्रहमान आहे. अडलेली कामे मार्गी लागतील.

 

कुंभ- कामाच्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल. महिलांनी साधक बाधक विचार करून पावले टाकावीत.

 

मीन-खूप काम करूनही नोकरीमध्ये वरिष्ठांची मनमानी सहन करावी लागेल. डोके शांत ठेवावे लागेल.

 

(टीप : वरील सर्व बाबी लेखणी बुलंद केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लेखणी बुलंद कोणताही दावा करत नाही.)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *